Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश 'ते' थिएटर पुन्हा उघडणार? दहा आठवड्यांत होणार निर्णय, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

‘ते’ थिएटर पुन्हा उघडणार? दहा आठवड्यांत होणार निर्णय, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Subscribe

नवी दिल्लीः अंदाजे २३ वर्षांपासून आगीच्या दुर्घटनेमुळे बंद असलेले दिल्लीतील उपहार चित्रपटगृह पुन्हा सुरु करावे ही नाही यावर स्थानिक न्यायालयाने दहा आठवड्यात निर्णय घ्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

या सिनेमागृहात १३ जून १९९७ रोजी आग लागली होती. त्यावेळी अभिनेता सन्नी देओल, सुनील शेट्टी यांची मुख्य भूमिका असलेला बॉर्डर चित्रपट या थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. भारत पाकिस्तान युद्धावर हा चित्रपट आधारीत असल्याने तो बघण्यासाठी एकच गर्दी झाली होती. दुपारी तीनचा शो सुरु असताना ४.५५ च्या सुमारास पार्किंग लॉटमध्ये आग लागली. त्यामुळे संपूर्ण चित्रपटगृहात धुर पसरला. प्रक्षेकांची धावपळ सुरु झाली. तळमजल्यावरुन सर्वजण बाहेर पडत होते. काहीजणांनी थिएटरच्या पहिल्या मजल्यावरुन उडी घेतली. काहीजण थिएटरमध्ये अडकले. हळूहळू आग पसरत गेली. या दुर्घटनेत ५९ लोकांचा मृत्यू झाला. त्यात २३ लहान मुले होती. या घटनेने संपूर्ण देश हादरला.

- Advertisement -

याप्रकरणी पोलिसांनी थिएटरचे सुशील आणि गोपाळ अंसल यांच्यासह चित्रपटगृहातील कर्मचारी, सुरक्षारक्षक यांच्यासह १६ जणांविरोधात गुन्हा नोंदवला. दिल्ली स्थानिक न्यायालयात याचा खटला चालला. २००७ मध्ये न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी धरले. तोपर्यंत आरोपींमधील चारजणांचे निधन झाले. न्यायालयाने आरोपींना गुन्ह्याप्रमाणे सात महिन्यांपासून ते सात वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावली. अंसल बंधूंना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षेविरोधात दोघांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका केली. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा एक वर्षांची केली. त्याला अंसल बंधूनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने २०१५ मध्ये निकाल देत या दोघांची शिक्षाच रद्द केली.

या दुर्घटनेनंतर चित्रपटगृहाला टाळे लावण्यात आले. हे थिएटर पुन्हा सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका अंसल बंधूंनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिल्लीतील स्थानिक न्यायालयाला दिले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -