घरताज्या घडामोडीअमेरिकेच्या कॉलोराडोमधील सुपरमार्केटमध्ये गोळीबार; एका पोलीस अधिकाऱ्यासह सहा जणांचा मृत्यू!

अमेरिकेच्या कॉलोराडोमधील सुपरमार्केटमध्ये गोळीबार; एका पोलीस अधिकाऱ्यासह सहा जणांचा मृत्यू!

Subscribe

अमेरिकेतील कॉलोराडो प्रांतातील बोल्डर शहरामधील एका सुपरमार्केटमध्ये अचानक गोळीबार झाला. या गोळीबारमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबतची माहिती द वॉल स्ट्रीट जर्नलने पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीद्वारे दिली आहे. तसेच या गोळीबाराच्या घटनेत मृताची संख्या वाढण्याची शक्यता जास्त आहे. सध्या पोलिसांचा अजूनही तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार केल्यानंतर लगेचच याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर संशयितास ताब्यात घेण्यात आले असून तो जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे. पोलिसांना सांगितले की, ‘तीनच्या सुमारास बोल्डर टेबर मेसा एरियामध्ये स्थित असलेल्या किंग सूपर्स स्टोअरमध्ये गोळीबार झाला. अजूनपर्यंत आरोपीने गोळीबार कोणत्या हेतूने केला? हे समजले नाही आहे. सध्या याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.’

- Advertisement -

दरम्यान बोल्डर पोलिसांनी ट्विट केले की, ‘आमच्या जवळ मृत्यूमुखी पडलेले पीडित आहेत. यामध्ये एका बोल्डर पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे. माध्यमांना कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करण्यास सांगितले गेले आहे. अद्याप तपास सुरू आहे.’

तर बोल्डर पोलीस विभागाचे कमांडर यांनी सांगितले की, ‘क्राइम एजेंसीद्वारे तपास सुरू केला आहे. या गोळीबारात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. दुर्दैव म्हणजे डिपार्टमेंटचा एका पोलीस अधिकाऱ्यांचा देखील मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राष्ट्रध्वजाच्या रंगाचा केक कापणे अवमान नाही – हायकोर्ट


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -