घरमहाराष्ट्रए भाई, तू जो कोण असशील...; अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

ए भाई, तू जो कोण असशील…; अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

Subscribe

अमृता फडणवीस यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांचा एकेरी उल्लेख केला.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच त्यांच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांचा एकेरी उल्लेख करत इशारा दिला आहे. भाई जगताप यांनी पोलिसांची खाती अॅक्सीस बँकेत कशी वर्ग केली याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं, असं म्हटलं आहे. याला प्रत्युत्तर देताना सरळ रस्त्यानं चालणाऱ्याला डिवचायचं नाही, असा इशारा दिला आहे. अमृता फडणवीस यांनी भाई जगतापांचा एकेरी उल्लेख केलेल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

राजीनामा मागणाऱ्या फडणवीस यांनी आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचं उत्तर द्यावं, असा सवाल भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. याला प्रत्युत्तर देताना अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. “ए भाई, तू जो कोण असशील, माझ्या वर बोट उचलायचं न्हाय! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यत तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक’ ला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय!” असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भाई जगताप यांचा एकेरी उल्लेख केला आहे.

- Advertisement -

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -