घरदेश-विदेशउत्तर प्रदेश : शेतकऱ्यांनी काढली गाईची अंत्ययात्रा

उत्तर प्रदेश : शेतकऱ्यांनी काढली गाईची अंत्ययात्रा

Subscribe

उत्तर प्रदेशमधील मुढारी गावात एका शेतकऱ्यांनी चक्क गाईची अंत्ययात्रा काढल्याची घटना समोर आली आहे.

आतापर्यंत माणसाची अंत्ययात्रा काढलेले पाहिले होते. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये एक वेगळेच दृश्य समोर आले आहे. एका शेतकऱ्यांने माणसांची नाही तर चक्क गाईची अंत्ययात्रा काढल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशमधील महोबा जिल्ह्यातील मुढारी गावातील ही घटना असून या गाईचे गावामधून अंत्ययात्रा काढली आहे. विशेष म्हणजे माणसांप्रमाणे या गाईचे आता तेरावे देखील केले जाणार आहे.

नेमके काय घडले?

उत्तर प्रदेशमधील मुढारी गावात बलराम मिश्रा हे शेतकरी राहत असून या शेतकऱ्यांकडे गेली २० वर्षे एक गाय राहत होती. जन्माष्टमीला या गाईचा जन्म झाल्यामुळे या गाईचे ‘कृष्णा’, असे नाव ठेवण्यात आले होते. दरम्यान, ही गाय यावेळी दहाव्यावेळी गर्भवती होती. मात्र, दुर्दैवाने या गाईचे वासरु सोमवारी पोटातच दगावले आणि आज या गाईचाही त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूनंतर बलराम यांनी गाईला लाल रंगाचे कपडे घालून तिची बैलगाडीवरुन गावात अंत्ययात्रा काढली. तसेच या गाईचे रितीरिवाजानुसार तेरावे घालणार असल्याचे देखील यावेळी सांगितले.

- Advertisement -

शेतकरी बलराम मिश्राने सांगितले की, ‘कृष्णा’ गाय ही आमच्यासाठी गाय नसून आई होती. ती आमच्या घरातील सर्वात मोठी सदस्य होती. तसेच ती केव्हाच जंगलात चरायला जात नव्हती. कोणीही घरात असो किंवा नसो गाय नेहमी दारात बसून राहायची. त्याचप्रमाणे तिला ‘कृष्णा’ म्हणून हाक मारली का ती मागून पळत यायची. त्यामुळे आमच्या गाईचे नाही तर आईचे निधन झाले आहे. त्याचप्रमाणे गाईचे तेरावे करण्यात येणार असून यावेळी गावातील गावकऱ्यांना जेवण देखील दिले जाणार आहे.


हेही वाचा – डॉक्टरांचे निवृत्ती वय वाढल्यास रुग्णसेवेला फायदा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -