घरमुंबईडॉक्टरांचे निवृत्ती वय वाढल्यास रुग्णसेवेला फायदा

डॉक्टरांचे निवृत्ती वय वाढल्यास रुग्णसेवेला फायदा

Subscribe

मुंबई पालिकेकडून आता डॉक्टरांचे निवृत्त वय ६२ वरून ६५ नेण्याचं परिपत्रक काढण्यात आलं आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सेवानिवृत्तीचे वय ६५ आता करण्यात आलं आहे. याबाबतचे परिपत्रक काढून सेवानिवृत्तीच्या वयाबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या परिपत्रकाला हॉस्पिटलमधील कनिष्ठ डॉक्टरांवर अन्याय होईल असं सांगत विरोध करण्यात आला. असं असलं तरीही डॉक्टरांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढवल्यास त्याचा फायदा रुग्णसेवेला आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना नक्की होईल, असं मत आयएमएचे माजी मुंबई अध्यक्ष डॉ. सुधीर पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

विद्यार्थ्यांना अनुभवी डॉक्टरांच्या ज्ञानाचा फायदा

आधीच डॉक्टर आणि रुग्णसंख्या यात प्रचंड तफावत आहे. डॉक्टर-रुग्ण रेशो ढासळलेला असताना पालिकेकडून डॉक्टरांचे निवृत्ती वय आता ६२ वरून ६५ वर नेण्याचं परिपत्रक काढण्यात आलं आहे. पण, याचा फायदा रुग्णांना होईल, असं मत डॉ. सुधीर पाटील यांनी मांडलं. निवृत्तीकडे वळलेल्या डॉक्टरांचा अनुभव दांडगा असतो. अशा अनुभवी डॉक्टरांचा रुग्णांना तर फायदा होतोच. शिवाय, वैद्यकीय विषयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अनुभवी डॉक्टरांच्या ज्ञानाचा फायदा होऊ शकतो.

- Advertisement -

निवृत्तीचे वय ६५ झाल्यास सार्वजनिक रुग्णसेवेचा फायदा होणार

पालिका हॉस्पिटलमधील प्रचंड रुग्णांची सेवेतील अनुभव, अनुभवातून देण्यात येणारे उपचार, शिवाय या अनुभवातून विद्यार्थ्यांना देण्यात येणारे ज्ञान हे अनुभवी डॉक्टर अधिक चांगल्याप्रकारे देऊ शकतात. शिवाय, पालिकेतील डॉक्टरांना २४ तास काम करण्याची सवय असते. तरुण डॉक्टरांना अनुभवांती घडवण्याचा फायदा होईल, असं डॉ. पाटील सांगतात. शिवाय, मुंबईतील कार्पोरेट हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले स्पेशल आजारांचे बहुतांश डॉक्टर हे ६० वर्षावरील आहेत. डॉक्टर वयाच्या नव्वदीपर्यंत चांगल्या स्थितीत काम करू शकतात अशी कित्येक उदाहरणे आहेत. त्यामुळे, निवृत्तीचे वय ६५ झाल्यास सार्वजनिक रुग्णसेवेचा फायदा होणार आहे.


हेही वाचा – २०१९ मध्ये मुंबई शहरात मलेरियामुळे एकही मृत्यू नाही!; पालिकेचा दावा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -