घरदेश-विदेशजुमलेबाजी का नाम मोदी; उत्तरप्रदेशमध्ये पोस्टरबाजी

जुमलेबाजी का नाम मोदी; उत्तरप्रदेशमध्ये पोस्टरबाजी

Subscribe

लखनऊच्या हजरतगंज कोतवालीच्या पार्क रोड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला असून तपास सुरु आहे.

पाच राज्यातील भाजपच्या पराभवानंतर भाजपवर जोरदार टीकेची झोड सुरुच आहे. पक्षांतर्गत मोदींविरोधी वातावरण तापू लागलं आहे. सभांमधून ‘मोदी-मोदी’चा नारा देणारे भाजप समर्थक आता आपापल्या राज्यातील प्रभावी नेत्याला समर्थन देऊ लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. लखनौमध्ये उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान बनवा अशा प्रकारचे पोस्टर्स झळकत आहेत. उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना या स्थानिक संघटनेने हो पोस्टर्स लावले असून योगींना आणा, देश वाचना असा संदेश या पोस्टर्सच्या माध्यमातून देण्यात आला आहे. याप्रकरणी उत्तरप्रदेश सरकारच्या आदेशानंतर उत्तरप्रदेश नवनिर्माण सेनेच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुमलेबाजी का नाम मोदी

लखनऊच्या हजरतगंज कोतवालीच्या पार्क रोड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला असून तपास सुरु आहे. पोस्टरची डिजाइन १० फेब्रुवारीला लखनौमध्ये होणाऱ्या धर्म संसदेला आधार मानून तयार करण्यात आले आहे. या पोस्टरच्या एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून त्या खाली असे लिहले आहे की, जुमलेबाजी का नाम मोदी तर दुसऱ्या बाजूला योगी आदित्यनाथ यांचा फोटो लावून त्याखाली हिंदुत्व का ब्रँड योगी असे लिहिले आहे. तसंच ‘मोदी हटाओ Vs योगी लाओ’, # योगी 4 PM’ अशा आशयाचे होर्डिंग्स झळकत आहेत. उत्तरप्रदेशच्या राजधानी लखनऊतील हजरतगंज येथे लावण्यात आलेल्या या पोस्टरवरुन जोरदार चर्चा सुरु आहे.

- Advertisement -

अमित जनाी कुख्यात माफिया

हे पोस्टर समोर आल्यानंतर लखनौ पोलिसांनी ताबडतोब कारवाईला सुरुवात करत पोस्टर्स काढून टाकण्यात आले. त्याचसोबत उत्तरप्रदेश पोलिसांनी उत्तरप्रदेश नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित जानी यांच्याविरोधात गुन्हा दाल केला आहे. अमित जानी यांचा पोलीस शोध घेत आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी छापेमारी देखील केली. लखनौच्या बसपा अध्यक्षा मायावती यांची मूर्तीची तोडफोड करणारा अमित जानी उत्तरप्रदेशचा कुख्यात माफिया आहे. तो स्वत:ला सपाचा जवळचा असल्याचे सांगत आहे. महाराष्ट्रात उत्तरभारतीयांवर होणारे हल्ले लक्षात घेता अमित जानी याने उत्तरप्रदेश नवनिर्माण सेनेची स्थापना केली. अमितवर अनेक गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -