घरमुंबईमहापालिका क्षेत्रातील नागरी प्रश्न तातडीने सोडवा - रविंद्र चव्हाण

महापालिका क्षेत्रातील नागरी प्रश्न तातडीने सोडवा – रविंद्र चव्हाण

Subscribe

कल्याण डोंबिवलीकरांच्या नागरी समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात असे निर्देश असे निर्देश राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी येथे दिले. नागरिकांच्या समस्यांवर आधारित बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विविध नागरी समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, असे निर्देश राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी येथे दिले. महापालिकेच्या विविध प्रश्नांसंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत आयुक्त गोविंद बोडके यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व प्रभागक्षेत्र अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत चव्हाण यांनी शहराच्या स्वतच्छतेसंदर्भात प्रश्ने उपस्थित करुन सफाई कर्मचा-यांसाठीच्या जॉब चार्टबद्दल उप आयुक्त‍ धनाजी तोरस्क‍र यांना विचारणा केली. यावर एक महिन्यात महापालिकेच्या सर्व प्रभागातील सफाई कर्मचा-यांचा जॉब चार्ट ठरविण्यात येईल, असे तोरस्कारांनी सांगितले.

आठ दिवसात प्रश्न सोडवा

डोंबिवली (पू) येथे स्टेशन परिसरात ट्रॅफिकची समस्या सोडविणे व परिवहन बसेसचे मार्ग बदलण्याबाबत परिवहन महाव्यवस्थापक मारुती खोडके यांना चव्हाण यांनी सुचना दिल्या. त्यावर खोडके यांनी येत्या ८ दिवसात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. याशिवाय डोंबिवली येथे पार्किंग प्लाझा वापरण्याबाबत तर शास्त्रीननगर रुग्णालय येथे अद्ययावत शवविच्छेदन गृह बांधणे ही कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश चव्हाण यांनी आयुक्तांना दिले. शहरातील डिपी रोडचे काम मार्गी लावावे, असे आदेश त्यांनी दिले.

- Advertisement -

पंधरा दिवसात निविदा प्रक्रिया सुरु होणार

यावेळी वर्षानुवर्षे बंद असलेल्या प्रलंबित सुतिकागृहाचा प्रश्न सोडविण्यात येवून गरोदर मातांच्या बाळंतपणाची व्यवस्था करण्याबाबतचा प्रश्न सोडविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावर आयुक्तांनी सुतिकागृहाबाबत येत्या १५ दिवसात निविदा प्रक्रिया सुरु करुन लवकरात लवकर ते सुरु करण्याचचे आश्वासन दिले. डोंबिवली पश्चिमेस असलेले फिश मार्केट त्वरित बांधण्यात यावे, अशी सुचनाही राज्यमंत्र्यांनी केली.चव्हाण यांनी बैठकीत उपस्थित केलेल्या कामांबाबत तातडीने निर्णय घेवून ती मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन आयुक्त बोडके यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -