घरक्रीडाजगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्ट कोरोना पॉझिटिव्ह

जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्ट कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्ट कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती समोर येत आहे. नुकतेच त्याने आपल्या ३४ व्या जन्मदिनानिमित्त पार्टी केली होती. जमैका मधील नेशनवाईड ९० एफएम या रेडिओ स्टेशनवर याबाबतची बातमी झळकली त्यानंतर बोल्टने आपल्या ट्विटर हँडलवर याची अधिकृत घोषणा केली.

ट्विटरवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये बोल्ट म्हणतो की, “मी कोरोना पॉझिटिव्ह झालो आहे. आता मी विलगीकरण कक्षात आहे. मी आता मित्रांपासून दूर राहणार आहे. सध्या मला कोणतेही लक्षणे दिसून आलेली नाहीत. त्यामुळे स्वतःला क्वारंटाईन करुन घेतले आहे.”

- Advertisement -

उसेन बोल्टने ऑलम्पिकमध्ये आठ सुवर्णपदक जिंकलेली आहेत. १०० आणि २०० मीटर धावपट्टीवर एक दशक बोल्टने आपला दबदबा कायम ठेवला होता. २०१८ मध्ये त्याने अॅथलेटिक्समधून निवृत्ती घेतली होती. २०१६ ऑलम्पिकमध्ये लागोपाठ तीन वेळा १०० आणि २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत विजेता होण्याचा विक्रम बोल्टने आपल्या नावावर केलेला आहे. त्यासोबतच २००९ मध्ये बर्लिनमध्ये आयोजित केलेल्या चॅम्पियनशिपमध्ये लागोपाठ तीन वर्ष चॅम्पियनचा खिताब पटकवला.

- Advertisement -

धावपटू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर बोल्टने व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून आपलं नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र धावपट्टीवर त्याला जो फेम मिळाला तो फुटबॉलच्या मैदानात मिळू शकला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -