घरताज्या घडामोडीViolence In Bengal: बंगाल हिंसाचारात १६ जणांचा मृत्यू, ममता दीदी म्हणाल्या भाजपने...

Violence In Bengal: बंगाल हिंसाचारात १६ जणांचा मृत्यू, ममता दीदी म्हणाल्या भाजपने आपला पराभव स्विकारावा

Subscribe

हिंसाचाराचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक आले चहा घेतला आणि गेले

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर हिंसाचारा उफाळला आहे. या हिंसाचारावर नवनिर्वाचित मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपली प्रतिक्रिया देत भाजपवर हल्लाबोल केला आहे. भारतीय जनता पार्टीने आपला पराभव स्विकारला पाहिजे. पश्चिम बंगालमधील हिंसाचारात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार असल्याचे ममतांनी सांगितले आहे. ममतांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले आहे की, जेव्हा निवडणूक सुरु होत्या त्या वेळी राज्याचा कायदा आणि सुव्यवस्था निवडणूक आयोगाच्या हातात होता तेव्हाही हिंसाचार झाला होता यामध्ये १६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वो आणि पश्चिम बंगालच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी बंगाल हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने आपला पराभव आणि जनादेश स्विकारायला हवा परंतु भाजप सत्य स्विकारण्यास तयार नसल्याचे ममतांनी म्हटले आहे. निवडणूक कालावाधीत राज्याचा कायदा व सुव्यवस्था निवडणूक आयोगाच्या हातात होता तरीही हिंसाचार घडून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आर्धे भाजप व टीएमसी मधले होते तर एकजण संयुक्त मोर्चाचा कार्यकर्ता होता. मृतांच्या कुटूंबीयांना २ लाखाची मदत घोषित करण्यात आली आहे.

- Advertisement -

केंद्रीय पथक आले चहा घेतला आणि गेले

दरम्यान ममता दीदींनी म्हटले आहे की, भाजपचे नेते राज्यात फिरत आहेत. समाजातील माथे भडकवत आहेत. राज्य सरकारला गठित होऊन २४ तास झाले नाहीतर नोटीस पाठवण्यात येत आहेत. केंद्रीय पथके पाठवण्यात येत आहेत. एक केंद्रीय टीम राज्यातील आढावा घेण्यासाठी आली होती. त्यांनी चहा घेतला आणि पुन्हा रवाना झाले कारण कोरोना परिस्थिती आहे. आता जर कोणतेही मंत्री खासगी विमानाने जरी आले तरी त्यांची आरटी-पीसीआर कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक दाखवावा लागेल. कोरोना नियम सगळ्यांना सारखे असले पाहिजेत. भाजप नेत्यांच्या वारंवार येण्याने राज्या कोरोना संसर्ग वाढत असल्याचा आरोप ममतांनी केला आहे.

राज्यपालांकडून मागवला कायदा सुव्यवस्थेचा अहवाल

केंद्रीय गृहमंत्रालयाने बंगालमध्ये होणाऱ्या हल्ल्यसंबंधीत कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा अहवाल राज्यपाल जगदीप धनकड यांच्याकडून मागवला आहे. तसेच उच्चस्तरीय ४ सदस्यांची टीमही गठीत केली आहे. या टीममध्ये सीआरपीएफ जवान आणि अतिरिक्त सचिव यांचा समावेश करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये अनेक भागात हिसंचार उफाळला आहे. यामध्ये भाजपची कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आहे. आतापर्यंत भाजपच्या ९ कार्यकर्त्यांचा हिंसाचारात मृत्यू झाला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -