घरदेश-विदेशराहुल गांधींविरोधातील वक्तव्याबद्दल पृथ्वीराज चव्हाणांवर कारवाई करा, काँग्रेस नेत्याची मागणी

राहुल गांधींविरोधातील वक्तव्याबद्दल पृथ्वीराज चव्हाणांवर कारवाई करा, काँग्रेस नेत्याची मागणी

Subscribe

नवी दिल्ली : एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा ओव्हरसीज काँग्रेसचे सचिव वीरेंद्र वशिष्ठ यांनी निषेध केला आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी शिस्तपालन समितीचे प्रमुख तारिक अन्वर यांच्याकडे केली.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून पृथ्वीराज चव्हाण हे विविध टीव्ही वाहिन्यांवर काँग्रेस पक्षांतर्गत निवडणुकीसंदर्भात चुकीची वक्तव्ये करीत आहेत. ते राहुल गांधी यांच्याबद्दलही ते अनुचित बोलत असल्याबद्दल सुद्धा त्यांच्यावर कारवाई करावी, असा ईमेल वीरेंद्र वशिष्ठ यांनी तारिक अन्वर यांना पाठवला आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुलाब नबी आझाद यांची नवी दिल्लीत भेट घेतली. हे दोन्ही नेते काँग्रेसमधील जी-23 गटातील समजले जातात. शशी थरूर, मणी शंकर अय्यर, मनीष तिवारी आणि अन्य नेत्यांचा समावेश असलेला हा गट पक्षांतर्गत सुधारणांबद्दल आग्रही आहे. त्यापैकी आनंद शर्मा, कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद या प्रमुख नेत्यांनी अलीकडचे राजीनामा दिला आहे.

- Advertisement -

राहुल गांधी ‘अपरिपक्व’ असल्याचे म्हणत पक्षातील सल्लागार यंत्रणा राहुल गांधी यांनी उद्ध्वस्त केल्याचा ठपका आझाद यांनी ठेवला होता. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांची भेट झाल्याने त्याबाबत वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. त्यातच त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सर्वात जुनी व्यक्ती पक्ष सोडून गेली हे दुर्दैवी असून पक्षाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. काँग्रेसचा सेक्युलर चेहरा सोडून गेला आहे. राजीनामा देताना आझाद यांनी दिलेले पत्र मी वाचले आहे. पत्रात ज्या बाबी नमूद केल्या आहेत, त्याच आम्ही दोन वर्षांपूर्वी एका गोपनीय पत्राव्दारे दिले होते. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष असायला हवा. काँग्रेसच्या घटनेप्रमाणे निवडून आलेले सदस्य असावेत, अशी आमची मागणी होती, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -