घरदेश-विदेश'मोदींना वोट' हाच आमचा आहेर

‘मोदींना वोट’ हाच आमचा आहेर

Subscribe

भाजपचा प्रचार करणाऱ्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेने निवडणूक आयोगाच्या नोटीसला निमंत्रण दिल्याची घटना उत्तराखंड येथे घडली.

निवडणुकीचे वारे देशात वाहत आहेत. राजकीय पक्ष आपला प्रचारासाठी अनेक पद्धतीने प्रयत्न करत आहे. देशातील काही भागात अचार सहिता लागू केल्यामुळे राजकीय पक्षाचा प्रचार करण्यावर बंदी घातली आहे. मात्र तरीही लग्नाच्या पत्रिकेमधून निवडणूक प्रचार करण्याची घटनासमोर आली आहे. उत्तराखंड येथे ही घटना घडली आहे. निमंत्रण पत्रिकेने राजकीय पक्षाचा प्रचार करणाऱ्याला निवडणूक आयोगाकडून चौकशीचे निमंत्रण मिळाले आहे. जगदीश चंद्र जोशी असे या इसमाचे नाव आहे. जगदीशने आपल्या मुलाच्या लग्नासाठी या पत्रिका छापल्या होत्या. जगदीश उत्तराखंड येथे गरूड जिल्ह्यातील जोशी कोला गावात ते राहत होते.

काय लिहिला होता मजकूर

“अहेर नका आणू पण वर वधूला आशीर्वाद देण्याअगोदर ११ एप्रिल रोजी मोदीजींना मत नक्की द्या.” अशा प्रकारचा संदेश निमंत्रण पत्रिकेत देण्यात आला होता. या संदेशाच्या बाजूला दोन कमळची फुले होती. गावात या पत्रिका वाटल्यानंतर याची माहिती सर्वांना मिळाले. यानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केली. निवडणूकी दरम्यानच्या काळात प्रचार केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

“दिलेल्या नोटीसच्या आंतर्गत नोटीस पाठवलेल्या व्य्क्तीला २४ तासात उत्तर देणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाला याची माहिती न मिळाल्यास त्यांच्यावर दंडात्मक करवाई होऊ शकते.” – रंजना, जिल्हा निवडणूक अधिकारी (डीईओ) 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -