घरदेश-विदेशवाड्रांना तुरुंगात टाकणे बाकी

वाड्रांना तुरुंगात टाकणे बाकी

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील निवडणुका बाकी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी जोरदार प्रचार करत काँग्रेसवर हल्लाबोल करत आहेत. भाजप आणि मोदी नेहमीच सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वाड्रा यांना लक्ष्य करून अप्रत्यक्षरित्या काँग्रेसवर टीका करत असतात. आता तर हरियाणामधील फतेहाबादच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॉबर्ट वाड्रा यांना इशाराच दिला आहे.

‘जनतेच्या आशीर्वादाने हा चौकीदार शेतकर्‍यांना लुटणार्‍यांना तुरुंगाच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन गेला आहे. आता त्यांना जामिनासाठी कोर्टाचे आणि अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) उंबरठे झिजवावे लागत आहे. यावेळी वाड्रांना कारागृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत नेले असून पुढील पाच वर्षांमध्ये त्यांना तुरुंगात टाकू,’ असा इशाराच मोदी यांनी वाड्रा यांना दिला आह

- Advertisement -

पाच टप्प्यांमधील मतदान झाले असून आता चित्र स्पष्ट झाले आहे. केंद्रात भाजपचीच सत्ता येणार. काँग्रेस आणि त्यांच्या ‘महामिलावटी’ साथीदारांनी देशाच्या सुरक्षेबाबत भाष्य केले आहे का?, जो स्वत:च्या देशाचे रक्षण करू शकत नाही, तो दुसर्‍यांचे काय रक्षण करणार, असा सवालही मोदींनी विचारला.

पाकिस्तानला आता मसूद अझरवर कारवाई करण्यासाठी भाग पाडले असून सत्तेत असताना काँग्रेस सरकार अशी कारवाई का करु शकली नाही, असा सवालही त्यांनी विचारला.भारत माता की जय, अशा घोषणा देण्यावर आक्षेप घेणार्‍या काँग्रेसने आता देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे,असे मोदी म्हणाले. स्वातंत्र्यानंतर देशभरात एकूण ३३ हजार पोलीस शहीद झाले. काँग्रेसने त्यांचा सन्मान केला नाही, असा आरोपही यावेळी मोदींनी केला.

- Advertisement -

अपयश झाकण्यासाठी मोदींकडून माझ्या नावाचा वापर-रॉबर्ट वाड्रा
मोदींच्या या विधानानंतर रॉबर्ट वड्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याप्रकारे आपल्यावर टीका करत आहेत ते पाहून आश्चर्याचा धक्का बसल्याचे म्हटले आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबी, बेरोजगारीसारख्या मुद्द्यांवर भाष्य न करता त्यांच्या प्रचारसभांमधून माझ्यावर ज्याप्रकारे हल्ला करत आहेत ते पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे’, असे रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -