घरदेश-विदेशराहुल गांधीना यशस्वी नेता बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, पण..., गुलाम नबी आझादांची...

राहुल गांधीना यशस्वी नेता बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, पण…, गुलाम नबी आझादांची खंत

Subscribe

राहुल गांधी यांनी यशस्वी नेता व्हावं यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. पण, त्यांना त्यात रुची नाही. ते एका जागी थांबतच नाहीत, असं आझाद म्हणाले. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यापासून पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा तिढाही अद्याप संपलेला नाही. त्यामुळे काँग्रेस नेतृत्त्व सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली जातेय. दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनीही या दोघांवर टीका केलीय. राहुल गांधी यांनी यशस्वी नेता व्हावं यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. पण, त्यांना त्यात रुची नाही. ते एका जागी थांबतच नाहीत, असं आझाद म्हणाले. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (We tried to make him a successful leader but he’s not interested..,” says GN Azad)

गुलाम नबी आझाद म्हणाले की, “तीस वर्षांपूर्वी सोनिया गांधींबद्दल जो आदर होता, तो आजही आहे. तसेच, इंदिरा गांधीबद्दल जो आदर आहे तसाच आदर राहुल गांधींबद्दलही आहे. त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी मी प्रार्थन करेन. राहुल गांधी यांना यशस्वी नेता बनवण्यासाठी आम्ही प्रयत्ने केले, पण त्यांनी फार रुची घेतली नाही.”

- Advertisement -

१३७ वर्षांत जे झालं नाही ते आता होतंय. गेल्या ५० वर्षांत अध्यक्ष पदासाठी निवडणुका लागल्या नाहीत. पण यंदा लागणार आहेत. गांधी कुटुंब परदेशात जाणार आहे म्हणून ते निवडणुका घेतायत. पण परदेशात जाण्याआधी किंवा परदेशातून जाऊन आल्यानंतर ते अध्यक्ष निवडू शकले असते. पण तसे झाले नाही. मी वेळ देत नाही असा माझ्यावर आरोप झाला. पण पक्षासाठी त्यांच्याकडेही वेळ नाही, असा आरोप गुलाम नबी आझाद यांनी केला आहे.

- Advertisement -

गुलाम नबी आझाद म्हणाले की, ‘मोदी फक्त बहाना आहे, जी २३ पत्र लिहिल्यानंतर त्यांचा माझ्यासोबत वाद झाला. त्यांना कोणी पत्र लिहावं हे कधीच त्यांना आवडलं नाही. त्यांना प्रश्न विचारलेलेही आवडायचे नाहीत. काँग्रेसच्या अनेक बैठका झाल्या पण त्यातून एकही निर्णय आला नाही.’

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -