घरदेश-विदेशतिहेरी तलाकविरोधी कायदा मानत नाही; ममता बॅनर्जींच्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

तिहेरी तलाकविरोधी कायदा मानत नाही; ममता बॅनर्जींच्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

Subscribe

ममता बॅनर्जी यांच्या मंत्रीमंडळातील नेते सिद्दीकुल्लाह चौधरी यांनी तिहेरी तलाकविरोधी कायद्याचे समर्थन करत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मोठे राजकीय वादंग निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

राज्यसभेत मंगळवारी तिहेरी तलाक कायदा मंजूर झाला. मात्र, या कायद्याला आपण मानत नसल्याचे ममता बॅनर्जी यांच्या मंत्रीमंडळातील सदस्य सिद्दीकुल्लाह चौधरी म्हणाले आहेत. त्यामुळे भाजपकडून ममता बॅनर्जी यांच्यावर टीका होत आहे. ‘तिहेरी तलाकविरोधी कायदा मंजूर होणे हा इस्लामवरील हल्ला असल्याचे चौधरी म्हणाले आहेत. त्यामुळे आम्ही तिहेरी तलावविरोधी कायदा स्वीकारणार नाहीत’, असे स्पष्टीकरण चौधरींनी दिले आहे.

नेमकं काय म्हणाले सिद्दीकुल्लाह चौधरी?

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सिद्दीकुल्लाह चौधरी म्हणाले की, ‘तिहेरी तलाकविरोधी कायदा इस्लाम विरोधात आहे. हा कायदा म्हणजे इस्लामवर हल्लाच आहे. त्यामुळे हा कायदा लागू झाल्यामुळे आपल्याला फार दु:ख झाले. यासंदर्भात काय कारवाई करणार? असा प्रश्न विचारला असता, केंद्रिय समितीची बैठक झाल्यास आम्ही पुढील कारवाई करु, असे चौधरी म्हणाले. सिद्दीकुल्लाह चौधरी हे जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष आहेत. दरम्यान, चौधरी यांच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून ममता बॅनर्जींवर निशाना साधला जात आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -