घरदेश-विदेशअंतर्वस्त्र नीट घाला, पाकिस्तान एअरलाइन्सचे कर्मचाऱ्यांना नवे फर्मान

अंतर्वस्त्र नीट घाला, पाकिस्तान एअरलाइन्सचे कर्मचाऱ्यांना नवे फर्मान

Subscribe

याबाबत जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटलं आहे की, केबिन क्रूशी संबंधित लोक कॅज्युअल कपड्यांमध्येच दुसऱ्या शहरांत जातात. हॉटेलमध्ये थांबतात. त्यामुळे त्यांनी कॅज्युअल कपडे घातल्याने कंपनीची प्रतिमा डागाळते.

इस्लामाबाद – पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सने आपल्या महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांसाठी फर्मान जारी केले आहे. केबिन क्रू कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी नवीन नियम बनवला आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित अंतर्वस्त्र घालणे सक्तीचे करण्यात आले आहेत. तसंच, कर्मचाऱ्यांच्या कपड्यांवर देखरेख ठेवण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइंसचा नवा विचित्र नियम सर्व पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी आहे. क्रू मेंबर योग्य कपडे परिधान करत नसतील तर कंपनीबद्दल ग्राहकांच्या मनात वेगळी प्रतिमा निर्माण होत असते. तसंच, क्रू मेंबरने ऑन ड्युटीसह ऑफ ड्युटीही व्यवस्थित कपडे परिधान केले पाहिजेत, असं पाकिस्तान एअरलाईन्सने म्हटलं आहे.

- Advertisement -

याबाबत जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटलं आहे की, केबिन क्रूशी संबंधित लोक कॅज्युअल कपड्यांमध्येच दुसऱ्या शहरांत जातात. हॉटेलमध्ये थांबतात. त्यामुळे त्यांनी कॅज्युअल कपडे घातल्याने कंपनीची प्रतिमा डागाळते.

केबिन क्रूच्या सदस्यांनी व्यवस्थित अंतर्वस्त्र घातले पाहिजेत. तसंच, ऑफ ड्युटी राहताता व्यवस्थित कपडे घातले पाहिजेत. आपल्या देशाच्या संस्कृतीला शोभेल असे कपडे कर्मचाऱ्यांनी परिधान केले पाहिजेत, असं जनरल मॅनेजर फ्लाइट सर्व्हिस आमिर बशीर यांनी सांगितलं.

- Advertisement -

या नियमांच्या कठोर अंमलबजावणीसाठी ग्रुमिंग अधिकाऱ्यांनाही खास निर्देश देण्यात आले आहेत. हे ग्रुमिंग अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कपड्यांवर लक्ष ठेवून असणार आहेत. जर कोणी नियम मोडला तर त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करून कारवाई केली जाणार आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -