घरदेश-विदेशअभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश

अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज कोलकत्त्यातील ब्रिगेड मैदानावर भव्य सभा होत आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून अनेक नेत्यांच्या भव्य रॅली, प्रचार सभा सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज कोलकत्त्यातील ब्रिगेड मैदानावर भव्य सभा होत आहे. याच दरम्यान ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती आज भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चांना पूर्नविराम मिळाला असून मिथुन चक्रवर्ती यांनी आज भाजपामध्ये जाहीरित्या प्रवेश केला आहे. भाजपच्या रॅली दरम्यान मुकुल राय यांच्या उपस्थितीत भाजपात मिथुन चक्रवर्ती यांनी प्रवेश केला. त्यामुळे मिथून यांनी पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या राजकारणात पाऊल ठेवलं आहे. कोलकाताच्या ब्रिगेड परेड ग्राऊंडवर पंतप्रधान मोदींची पहिली सभा ऐतिहासिक सभा असल्याचा दावा केला जात आहे. यासाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदींच्या उपस्थिती आधीच मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणआधी मिथुन चक्रवर्ती यांचे भाषण होणार असल्याचीही चर्चा आहे. या भव्य सभेत कडक सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. या सभेत १५०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून सुरक्षेसाठी ३००० जवान तैनात केले आहेत.

- Advertisement -

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मागील महिन्यात मिथून चक्रवर्ती यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर मिथून चक्रवर्ती भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र ही भेट कौटुंबिक असल्याचे चक्रवर्ती यांनी जाहीर केले. यातच काल मिथून चक्रवर्ती यांनी बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कैलास विजयवर्गीय यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीची माहिती विजयवर्गीय यांनी ट्विट करून दिली. त्यामुळे मिथून भाजपात प्रवेश करणार असल्याच जवळपास निश्चित मानलं जात होतं. यात आज मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपाच जाहीर प्रवेश करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. २०११ मध्ये मिथुन यांनी ममता बॅनर्जी यांच्या विनंतीवरून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तृणमूलने त्यांना राज्यसभेवर पाठवल होतं. मात्र, २०१६ मध्ये मिथुन यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकारणातून काढता पाय घेतला होता. मात्र, भागवत यांच्या भेटीनंतर मिथुन चक्रवर्ती भाजपात प्रवेश करुन पुन्हा एकदा राजकारणात पाऊल ठेवणार असल्याच्या चर्चा सुरू झाली होती. आज पुन्हा एकदा मिथून यांनी बंगालच्या राजकारणात पाऊल ठेवलं आहे.


हेही वाचा- ‘मनसे’चा वर्धापन दिन सोहळा कोरोनामुळे रद्द; सदस्य नोंदणी होणार ऑनलाईन

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -