घरदेश-विदेशअसं चालतं VVPAT मशीन!

असं चालतं VVPAT मशीन!

Subscribe

लोकसभा २०१९ ची निवडणूक संपूर्णतः व्हीव्हीपॅट मशीनवर होणार आहे. याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानेच केली आहे. देशातील सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशीन बसवण्यात येणार आहेत.

लोकसभा २०१९ ची निवडणूक संपूर्णतः व्हीव्हीपॅट मशीनवर होणार आहे. याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानेच केली आहे. देशातील सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशीन बसवण्यात येणार आहेत. मतदार एका विशिष्ट उमेदवाराला मतदान करतो. मतदाराने ज्या उमेदवाराला मत दिले आहे, ते मत त्याच उमेदवाराला मिळाले आहे की नाही, याची शहानिशा करण्यासाठी व्हीव्हीपॅट वापरले जाते. ‘Voter Verifiable Paper Audit Trail’ म्हणजेच VVPAT. तर EVM मशीनद्वारे मतदान होते. मात्र या मशीनमध्ये काही बिघाड झाल्यास किंवा तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास व्हीव्हीपॅटद्वारे मतमोजणी केली जाऊ शकते. मतदारानं उमेदवाराला दिलेलं मत सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं तयार करण्यात आलेली दुसरी पर्यायी यंत्रणा म्हणजेच व्हीव्हीपॅट आहे.

EVM मशीनमध्ये घोळ असल्याच्या तक्रारी अनेक राजकीय पक्षांकडून केल्या जातात. EVM द्वारे मतांची अफरातफर होते, असा आरोप वारंवार केला जातो. अशा परिस्थितीत मत अबाधित राखण्यासाठी VVPAT उपयोगात आणलं जातं. मतदारानं मत दिल्यानंतर व्हीव्हीपॅट त्याच क्षणी त्याची माहिती मतदाराला देतं. आपलं मत ठरवलेल्या उमेदवारालाच मिळालं आहे ना यावर VVPAT शिक्कामोर्तब करतं.

- Advertisement -

असं चालतं व्हीव्हीपॅट मशीन

मतदार EVM मशीनवर उमेदवाराच्या नावासमोरचं बटन दाबतो. त्याचवेळी उमेदवाराचं नाव, क्रमांक आणि चिन्ह यांचा उल्लेख असलेली VVPAT स्लिप ७ सेकंद मतदाराला दिसते. त्यानंतर आपोआप ही स्लिप कट होऊन बीप वाजतो आणि स्लिप सीलबंद पेटीत जमा होते. मतदान करताना काही तांत्रिक अडचण उद्भवली असेल तर त्याचीही माहिती दिली जाते. जे ठरवलं तसंच मतदान केलं आहे ना? याची खातरजमा करण्याची संधी मतदाराला मिळते. VVPAT मशीन काचेच्या पेटीत असतं. जेणेकरून मतदान केलेला मतदारच स्लिपवरचा तपशील पाहू शकतो. VVPAT मशीन उघडण्याचा अधिकार फक्त निवडणूक अधिकाऱ्यांना असतो. मतदारांना VVPAT मशीन उघडता येत नाही. त्याला हातही लावता येत नाही.

VVPAT मधील पेपर रोल प्रत्येक मतदानावेळी १५०० स्लिप प्रिंट करू शकतो. EVM मशीनमध्ये गडबड असल्याचे आरोप निवडणूक आयोगाने नाकारले आहेत. मात्र EVM वरील आरोपांना काटशह देण्यासाठी काही निवडणुकांमध्ये VVPATचा प्रयोग राबवण्यात आला आहे.

- Advertisement -

व्हीव्हीपॅटचा इतिहास

VVPATची अंमलबजावणी करण्यासाठी अतिरिक्त खर्च येतो. या व्यवस्थेसाठी स्वतंत्र हार्डवेअर वापरावं लागतं. १८९९ मध्ये अमेरिकेत जोसेफ ग्रे यांनी यांत्रिक पद्धतीनं मतदान होताना कागदावर त्याची माहिती प्रसिद्ध होईल अशा स्वरुपाच्या व्यवस्थेचं प्रारूप तयार केलं होतं. जवळपास शतकभरानंतर रेबेका मर्क्युरी यांनी VVPATला मूर्त स्वरुपात आणलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -