घरदेश-विदेश'जेव्हा सत्तेत येऊ, तेव्हा तिन्ही कृषी विधेयके फेकून देऊ'; राहुल गांधी यांची...

‘जेव्हा सत्तेत येऊ, तेव्हा तिन्ही कृषी विधेयके फेकून देऊ’; राहुल गांधी यांची घोषणा

Subscribe

केंद्र सरकारने तीन नवे कृषी विधेयके आणली असून त्याला देशभरातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. यावर काँग्रेसदेखील आक्रमक झाली असून आम्ही सत्तेत आल्यास ही सर्व विधेयके रद्द करू, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी पंजाबमधील मोगा येथे काँग्रेसने आयोजित केलेल्या शेती वाचवा यात्रेत जनतेला संबोधन करताना हा पवित्रा बोलून दाखवला. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, मी तुम्हाला खात्री देतो की ज्या दिवशी काँग्रेस पार्टी सत्तेत येईल, आम्ही हे तिन्ही काळे कायदे मोडीत काढू आणि कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ. या कायद्यांना पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक विरोध असून त्यांनी याविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन केले आहे.

- Advertisement -

शेतकऱ्यांना संपवण्याचा सरकारचा डाव

राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेत मोदी सरकारच्या या विधेयकावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, हा सर्व प्रकार शेतकऱ्यांची जमीन आणि पैशाबाबतचा आहे. पहिल्यांदा मी हा प्रकार भठ्ठा परसौलमध्ये पहिला. जेव्हा यांना पाहिजे तेव्हा ते शेतकऱ्यांची जमीन हिसकावून घेत होते. आम्ही भूमिअधिग्रहण कायदा बदलला आणि तुमच्या जमिनीचे रक्षण केले. बाजार मुल्यापेक्षा चारपट जास्त भाव दिला. मोदी आले आणि त्यांनी आमचा नवा कायदाच बदलून टाकला. शेतकऱ्यांच्या जमीनीसाठी आम्ही संसदेत लढलो होतो. शेतकऱ्यांना संपवण्याचा सरकारचा डाव आहे.

हेही वाचा –

Indo v/s China : सीमेवर तणाव! लडाखमध्ये होणार लष्करी पातळीवर चर्चा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -