घरदेश-विदेशशाळांना राजकारणात आणू नका - who

शाळांना राजकारणात आणू नका – who

Subscribe

शाळा सुरु करण्यासाठी घाई करु नका

जगावरील कोरोनाचं सावट अजूनही कमी झालेलं नाही. कोरोनामुळे अनेक देशांत जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शैक्षणिक संस्था बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीच्या शिक्षणाचा पर्याय निवडण्यात आला आहे. मात्र काही देश हे पुन्हा शाळा सुरु करण्याचा घाट घालताना दिसत आहेत. यावर जागतिक आरोग्य संघटनेने गंभीर इशारा देत शाळांना राजकारणात आणू नका, असं आवाहन केलं आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. शाळा पुन्हा सुरू करण्यास घाई करणाऱ्या देशांना संघटनेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. शाळा पुन्हा केल्यास कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर होईल, अशी भीती संघटनेचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख माइक रायन यांनी व्यक्त केली आहे. तसंच शाळांना राजकरणात आणू नये, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. शाळा सुरु करण्याची घाई करण्यापेक्षा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यास सुरक्षितपणे त्या सुरु केल्या जाव्यात, असा सल्ला रायन यांनी यावेळी दिला आहे.

- Advertisement -

दरम्यान, कोरोनामुळे निर्माण झालेली भयावह परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. तसंच ही परिस्थिती अजूनही गंभीर होईल असा, इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ग्रेबेयेसस यांनी दिला आहे. देशांनी जर अधिक सतर्कतेने आरोग्याशी संबंधित काळजी न घेतल्यास ही महामारी आणखी भयानक रूप धारण करेल, अशी भीती ग्रेबेयेसुस यांनी व्यक्त केली आहे.


हेही वाचा – सचिन पायलट भाजपच्या संपर्कात

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -