घरदेश-विदेशबायकोने दिला नवऱ्याला भररस्त्यात चोप; व्हिडीओ झाला व्हायरल

बायकोने दिला नवऱ्याला भररस्त्यात चोप; व्हिडीओ झाला व्हायरल

Subscribe

आपल्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय बायकोला आला होता.

विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घटला आहे. नवऱ्याचे विवाहबाह्यसंबंध असल्याने बायकोने नवऱ्याची भर रस्त्यात धिंड काढली. नवऱ्याची कॉलर पकडून त्याला बेदम चोप दिला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हे जोडपे उत्तर प्रदेशमधील पीलीभीत जिल्ह्यात राहणारे आहे. दहा वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले. आपल्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय बायकोला आला होता. गेली अनेक दिवस नवरा प्रियसीच्या घरी ये जा करत होता. नवरा घरातून बाहेर पडताच बायकोने लगोलग त्याचा पाठलाग केला. तेव्हा नवरा थेट त्याच्या प्रियसीच्या घरी पोहचला. बायकोला राग अनावर अनावर झाल्याने तिने नवऱ्याला प्रियसीच्या घरातून ओढत बाहेर आणले.त्यानंतर भररस्त्यात तिने नवऱ्याला बेदम मारायला सुरूवात केली. घटनास्थळी असलेल्या लोकांना हा संपूर्ण प्रकार कॅमेरामध्ये कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केला.

- Advertisement -

यानंतर बायकोने नवरा आणि त्याच्या प्रियसीच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याबाबत पीडित महिलेची चौकशी केली. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये बायको नवऱ्याच्या प्रियसीच्या घराबाहेर उभी राहून ओरडताना दिसत आहे. या संपूर्ण प्रकारानंतर दोन-तीन दिवसातच बायको आपल्या माहेरी निघून गेली.


हेहि वाचा – Hathras Rape Case: ‘अधिकारी म्हणत होते तुम्हाला पैसे मिळतील’; पीडितेच्या आईचा खुलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -