घरदेश-विदेशVIDEO: भारताच्या वाघाचे सहकाऱ्यांकडून जल्लोषात स्वागत

VIDEO: भारताच्या वाघाचे सहकाऱ्यांकडून जल्लोषात स्वागत

Subscribe

पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झालेला भारताचा वाघ हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याचे जगभरामध्ये कौतुक होत आहे. अशातच अभिनंदन यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जम्मू-काश्मीरच्या एअर बेसवर अभिनंदन यांचे त्यांच्या सहकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले आहे.

- Advertisement -

अभिनंदन यांच्यासोबत काढले फोटे 

जम्मू काश्मीरमधील लष्कराच्या तळावर अभिनंदन यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले मात्र भारताच्या या हिरोसोबत सेल्फी काढण्याचा मोह त्यांना देखील आवरला नाही. अभिनंद यांच्या सहकाऱ्यांची त्यांच्यासोबत फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यादरम्यान अभिनंदन यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत त्यांच्या कुटुबियांचे आभार मानले. सर्वांच्या प्रार्थनेमुळे मी बरा झालो असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याच्या स्वागताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तानचे एफ -१६ विमान पाडले

पुलवामा येथे दहशतवाद्यांनी १४ फेब्रवारीला सीआरपीफच्या जवानांच्या बसवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ४० पेक्षा अधिक सीआरपीएफचे जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला घेत भारतीय जवानांनी पाकिस्ताच्या हद्दीत घुसून बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यांना हुसकावून लावण्याच्या प्रयत्न केला. अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एफ-१६ हे लढाऊ विमान पाडले. त्यानंतर अभिनंदन यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत पडले आणि अभिनंदन पाकिस्तानच्या तावडीमध्ये सापडले. पाकिस्तानच्या तावडीमध्ये असलेल्या भारताच्या वाघाची तीन दिवसानंतर सुटका झाली.

- Advertisement -

अभिनंदन यांची बदली 

विंग कमांडर वर्धमान अभिनंदन यांची सुटका झाल्यानंतर त्यांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली आणि त्यांना रजेवर पाठवण्यात आले होते. मात्र अभिनंदन यांनी आपल्या चेन्नई येथील घरी न जाता काश्मीर येथील एअर फोर्सच्या तळावर जाणे पसंद केले. सध्या कर्तव्यावर असलेल्या काश्मीर खोऱ्यातून अभिनंदन यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना पश्चिम विभागातील एखाद्या महत्त्वपूर्ण एअरफोर्सच्या तळावर नियुक्त करण्यात येणार आहे. मात्र त्यांच्या नियुक्तीचे ठिकाण गुप्त ठेवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -