व्हिडिओ पाहून तिनं केली प्रसूती; आईसह बाळाचा दुर्दैवी मृत्यू

after delivery women and baby dies
मृत्यू

उत्तरप्रदेशमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. गर्भवती महिलेने यूट्यूबवर प्रसूतीचा व्हिडिओ पाहून मुलाला जन्म दिला. मात्र या घटनेमध्ये आईसह बाळाचा दुर्दवी मृत्यू झाला आहे. प्रसूतीनंतर अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे दोघांचा देखील मृत्यू झाला आहे. उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. गर्भवती महिला अविवाहीत होती. शेजारच्यांमुळे हा सर्वप्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे.

कुटुंबियांशी वाद असल्याने राहत होती एकटी

युट्यूबवरचा प्रसूती व्हिडिओ पाहून प्रसूती करणे महिलेला महागात पडले आहे. तिचा आणि बाळाचा यामध्ये दुर्देवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी उत्तरप्रदेशच्या बहराईच येथील रहिवाशी आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून ती गोरखपूर येथे राहत होती. लग्नाआधीच ती गर्भवती राहिल्यामुळे तिचे तिच्या कुटुंबियांशी सतत भांडण होत होते. ते बाळ नक्की कोणाचा आहे हे देखील तिने तिच्या कुटुंबियांना सांगितले नव्हते. ती बाळाला जन्म देण्यावर ठाम होती. कुटुंबियांशी सतत होणाऱ्या वादामुळे तिने एकटी राहणे पसंद केले. त्यामुसार ती चार दिवसांपूर्वीच बिलंदपूर येथे भाड्याने घर घेतले होते.

पोलिसांकडून तपास सुरु

पीडित तरुणीच्या घराच्या दरवाजातून रक्ताचे ओघळ बाहेर येत असल्याचे पाहून शेजारचे घाबरले त्यांनी ताबडतोब पोलिसांना फोन करुन माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा तोडला. घरामध्ये प्रवेश केला असता पीडित तरुणी आणि बाळ मृतावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पोलिसांनी दोघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. रविवारी पीडित तरुणीला प्रसुती कळा येऊ लागल्या. तिने डॉक्टरांना बोलावले नाही. तर दरवाजा बंद करुन तिने युट्यूबवरील प्रसुती व्हिडिओ पाहून स्वत: प्रसूती करण्याचा प्रयत्न केला. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे दोघांचा देखील दुर्देवी मृत्यू झाला.