घरदेश-विदेशअॅम्ब्युलन्स नाकारल्याने धावत्या बसमध्ये प्रसूती!

अॅम्ब्युलन्स नाकारल्याने धावत्या बसमध्ये प्रसूती!

Subscribe

देशाची प्रगत देशाकडे वाटचाल होत असताना अनेक राज्यांमध्ये अजूनही साध्या आरोग्य सेवा नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी अशा घटना सर्रास घडताना दिसत आहेत.

प्रसूतीसाठी स्थानिक दवाखान्यात दाखल झालेल्या एका महिलेला अँम्बुलन्स नाकारल्यामुळे तिला धावत्या बसमध्ये बाळाला जन्म द्यावा लागला. त्यामुळे मध्यप्रदेशातील आरोग्यसेवेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. मध्यप्रदेशच्या छातरपूर परिसरात हा सगळा प्रकार घडला. त्यामुळे रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा प्रत्यय तर आला आहेच शिवाय अजूनही अनेक ठिकाणी आरोग्यसेवा नाहीच, असे निदर्शनास आले आहे.

नेमकं काय घडलं ?

एका महिलेला प्रसूतीसाठी छातरपूर येथील एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या महिलेला स्थानिक रुग्णालयाने जिल्हा रुग्णालयात  घेऊन जायला सांगितले. त्यावेळी त्या महिलेला प्रसूती कळा येत होत्या. पण तरीदेखील रुग्णालयाने माणुसकी दाखवली नाही. राग येण्याची गोष्ट अशी की, जिल्हा रुग्णालयात पाठवण्यासाठी तिला  अॅम्बुलन्स देण्यात आली नाही. त्यामुळे या महिलेला बसमधून जावे लागले. पण नेमक्या बसमध्येच तिच्या कळा वाढल्या आणि तिची धावत्या बसमध्ये प्रसूती झाली. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

याआधीही झाले असे प्रकार

छत्तीसगडच्या जशपूर परीसरात मंगळवारी अशीच घटना घडली. प्रसूती कळेत एका महिलेला मैलभर चालण्यास भाग पाडले गेले. कोणतीही आरोग्य सेवा नसताना आणि रस्त्यांच्या दूरवस्थेमुळे या महिलेने बाळाला रस्त्यातच जन्म दिला. अवघ्या काही मिनिटातच ते बाळ दगावले.

आरोग्यसेवांविषयी प्रश्नचिन्ह

देशाची प्रगत देशाकडे वाटचाल होत असताना अनेक राज्यांमध्ये अजूनही साध्या आरोग्य सेवा नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी अशा घटना सर्रास घडताना दिसत आहेत. आरोग्य सेवांसोबत पायाभूत सुविधांमध्येही कुठेतरी कमी पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -