घरदेश-विदेशमहिला कुस्तीपटूंच्या याचिकेवर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी; FIR दाखल न केल्याने दिल्ली...

महिला कुस्तीपटूंच्या याचिकेवर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी; FIR दाखल न केल्याने दिल्ली पोलिसांना नोटीस

Subscribe

महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळाबद्दल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात एफआयराची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. आता या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी केली जाणार आहे

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख बृजभूषण सिंह आणि इतर प्रशिक्षकांनी अल्पवयीन महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप काही भारतीय कुस्तीपटूंनी केला होता. त्यानंतर महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळाबद्दल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात एफआयराची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. आता या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी केली जाणार आहे. ( Women wrestlers plea heard on Friday Court says allegations serious notice to Delhi Police for not filing FIR )

CJ DY चंद्रचूड यांनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात एफआयआर न नोंदवल्याबद्दल दिल्ली पोलिसांना नोटीसही बजावली आहे. याशिवाय, सर्वोच्च न्यायालयाने 7 महिला तक्रारदारांची नावे न्यायालयीन रेकॉर्डमधून काढून टाकण्यास सांगितले, जेणेकरून त्यांची ओळख उघड होणार नाही. 7 महिला कुस्तीपटूंनी सोमवारी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी याचिका दाखल होती.

- Advertisement -

कुस्तीपटूंचे वकील नरेंद्र हुड्डा म्हणाले, “आम्ही आरोपी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश मागितले आहेत.” गंभीर आरोप असूनही दिल्ली पोलिस या प्रकरणी एफआयआर नोंदवत नव्हते. एससीला हे प्रकरण गंभीर वाटले आणि त्यांनी दिल्ली सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून त्यांची प्रतिक्रिया मागितली आहे.

( हेही वाचा: पाकिस्तानमध्ये आत्मघाती हल्ला: 12 पोलिस ठार तर 40 जखमी; स्फोटाची तीव्रता एवढी, तीन इमारतीही कोसळल्या )

- Advertisement -

बजरंग पुनिया म्हणाला, ही केवळ कुस्तीची लढत नाही, कारण अशा प्रकारचे शोषण प्रत्येक खेळात होते. त्यामुळे तो इतर सर्व खेळपटूंचाही पाठिंबा मिळवत आहे. चौकशी समितीचा भाग असलेल्या बबिता म्हणाल्या – माझ्याकडून अहवाल हिसकावून घेण्यात आला आहे. दरम्यान, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या देखरेख समितीच्या सदस्या बबिता फोगट म्हणाल्या की, तपास योग्य प्रकारे झाला नाही, मला अहवाल वाचण्याची परवानगीही देण्यात आली नाही. बबिता म्हणाल्या की, हा अहवाल सर्वांच्या संमतीने तयार झालेला नाही. तपास अहवाल वाचत असतानाच माझ्या हातून तो हिसकावण्यात आला. साईचे संचालक आणि चौकशी समितीचा भाग असलेल्या राधिका श्रीमन यांनीही माझ्यासोबत गैरवर्तन केले. माझे अनेक मुद्दे दुर्लक्षित झाले. त्या अहवालात मी माझा आक्षेप नोंदवला आहे.

त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी 7 कुस्तीपटूंची याचिका स्वीकारली आहे. ज्यामध्ये संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्याविरोधात एफआयआरची मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

विनेश फोगाट यांनी आरोप केला की, ‘कुस्तीमध्ये क्वचितच एखादी मुलगी असेल जिच्यावर अत्याचार झाला नसेल. हे अनेक जणांसोबत घडले आहे, याची संख्या मी सांगू शकत नाही. ही संपूर्ण यंत्रणा या कामात जोडलेली आहे. एकटा माणूस काहीच करत नाही. कोणती मुलगी कुठून कुठे जात आहे, याचा पाठपुरावा संपूर्ण यंत्रणा करत असते. त्यांचा मोबाईल क्रमांक घ्यावा लागेल, त्यांच्याशी संवाद साधावा लागेल. ही एक संपूर्ण व्यवस्था आहे, असा आरोपही फोगाट यांनी केला.

WFI ने सांगितले की, कुस्तीपटू संघटनांवर दबाव टाकून समित्या तयार करतात. जेव्हा तपास निवाड्यापर्यंत पोहोचतो तेव्हा प्रत्येकाला चुकीचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. व्यवस्था आणि कायद्यावर विश्वास न दाखवता सत्तेचे प्रदर्शन करणे कितपत योग्य आहे.

तपासासाठी 2 समित्या, दोन्ही समित्या मेरी कोम यांच्या अध्यक्षतेखाली दोन समित्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पहिली- केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची पर्यवेक्षण समिती यात मेरी कोम यांना अध्यक्ष करण्यात आले आहे. कुस्तीपटू योगेश्वर दत्त, ध्यानचंद पुरस्कार विजेते तृप्ती मुरगुंडे, भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) सदस्य राधिका श्रीमन, शिवाय TOPS समितीचे माजी सीईओ कमांडर राजेश राजगोपालन यांना सदस्य बनवण्यात आले आहे. तसचं बबिता यांचा सहावा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) कुस्तीपटूंच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी 7 सदस्यीय समितीही स्थापन केली आहे. बॉक्सर मेरी कॉम या समितीच्या अध्यक्षा होत्या. यामध्ये तिरंदाज डोला बॅनर्जी, बॅडमिंटनपटू अलकनंदा अशोक, कुस्तीपटू योगेश्वर दत्त, भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनचे अध्यक्ष सहदेव यादव यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -