घर ताज्या घडामोडी पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून विरोध असेल तर... अजित पवारांचं मोठं वक्तव्य

पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून विरोध असेल तर… अजित पवारांचं मोठं वक्तव्य

Subscribe

कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे रिफायनरी सर्वेक्षणाचा दुसरा दिवस आहे. या सर्वेक्षणाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे. हे आंदोलन अधिक तीव्र झाले असून, पोलिसांनी रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या सुमारे २५ महिला आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. विरोध जर पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून असेल तर तर त्यांची समजूत काढली पाहिजे. काही तज्ज्ञ लोकांनी त्यांच्या शंकेचं निरसण केलं पाहीजे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे.

अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकारनं संवेदनशीलपणे त्यावर मार्ग काढावा आणि चर्चा करावी. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून प्रकल्पांबाबत अनेक आंदोलनं करण्यात आली. परंतु त्यामध्ये अनेक लोकांचं सहकार्य मिळालं. समृद्धी महामार्गाला देखील लोकांचा विरोध होता. पण त्यावर चर्चा झाली आणि त्यांना योग्य तो मोबदला मिळाला. त्यामुळे समृद्धी महामार्ग तयार झाला. त्याचप्रमाणे या प्रकल्पाला देखील काहींकडून विरोध होतोय. परंतु हे आंदोलन किंवा विरोध करण्यामागे त्याचं मूळ कारण काय आहे, हे समजून घेतलं पाहीजे. त्यांचा विरोध जर पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून असेल तर त्यांची समजूत काढली पाहिजे. काही तज्ज्ञ लोकांनी त्यांच्या शंकेचं निरसण केलं पाहीजे, असं अजित पवार म्हणाले

- Advertisement -

एनरॉन प्रकल्पासाठी सुद्धा विरोध करण्यात आला होता. त्यानंतर तो विरोध माळवला आणि प्रकल्प त्याठिकाणी झाला. आता यासंदर्भात जे काही सुरू आहे. त्यासंदर्भात मुस्कटदाबी होऊ नये, जे होईल ते संमतीने व्हावं आणि त्यामधून मार्ग काढला जावा ही माझी अपेक्षा आहे. कारण आम्ही विकासकामाला विरोध करत नाही, असं पवार म्हणाले.

प्रसार माध्यमांना त्याठिकाणी जाऊ दिलं जात नाही. यावर पवार म्हणाले की, तेथील राज्यकर्त्यांनी तिथे हस्तक्षेप करावा आणि स्थानिक कार्यकर्ते किंवा पदाधिकारी यांच्यापैकी एकानं आंदोलकांशी चर्चा करावी, त्यामुळे मार्ग निघण्यास सोईस्कर होईल. परंतु पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि पुढच्या भावी पिढीचं नुकसान होणार नाही, याची देखील काळजी घ्यावी, असंही पवार म्हणाले.

- Advertisement -


हेही वाचा : शिंदे-फडणवीस या महिलांवर गोळ्या चालवणार का?, संजय राऊतांचा सवाल


 

- Advertisment -