घरक्रीडावंडर किड शाहिद गांगुलीच्या अकादमीमध्ये गिरवणार क्रिकेटचे धडे

वंडर किड शाहिद गांगुलीच्या अकादमीमध्ये गिरवणार क्रिकेटचे धडे

Subscribe

शाहिदचे क्रिकेट खेळतानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंप्रमाणेच इंग्लंडचा क्रिकेटपटू केविन पीटरसन याने देखील त्याचे कौतुक केले.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असलेला कोलकात्याचा तीन वर्षीय शाहिद शेख लवकरच सौरव गांगुलीच्या क्रिकेट अकादमीमध्ये क्रिकेटचे रितसर प्रशिक्षण घेणार आहे. दरम्यान दोन वर्षांचा असल्यापासून शाहिद शेख क्रिकेटमधील अफलातून शॉट्स लगावत आहे. त्याचे क्रिकेट खेळतानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंप्रमाणेच इंग्लंडचा क्रिकेटपटू केविन पीटरसन याने देखील त्याचे कौतुक केले.

मुलाचे क्रिकेट पाहून वडील आश्चर्यचकीत

शाहिदच्या क्रिकेट प्रेमाविषयी माहिती देताना त्याचे वडील शेख शमशेर यांनी सांगितले की, “एके दिवशी मी टिव्हीवर भारत-ऑस्ट्रेलियामधील क्रिकेटचा सामना पाहत होतो. त्यावेळी शाहिद २ वर्षांचा होता. त्यावेळी मलादेखील क्रिकेट खेळायचे आहे, असे तो म्हणाला. मी त्याला प्लास्टिकची बॅट आणि बॉल घेऊन दिली. त्याने मारलेले शॉट्स पाहून मी आश्चर्यचकीत झालो. तो एखाद्या क्रिकेटरप्रमाणे खेळत होता. मी त्याला विचारले असता त्याने सांगितले की, “टिव्हीत जसे पाहिले तसेच केले.” त्यानंतर सहा महिने घरात सराव केल्यानंतर अडीच वर्षांच्या शाहिदला क्रिकेट अकादमीमध्ये पाठवले.

- Advertisement -

हेही वाचा – पुनरागमन कधी ? माहित नाही

गांगुलींकडून प्रशिक्षणाचे आश्वासन

दरम्यान शाहिदचे वडील शेख शमशेर हे सॅलूनच्या दुकानात काम करतात. यामद्वारे त्यांना महिना ६ ते ८ हजार रुपयेच मिळतात. यातूनच त्याचे घर चालते. भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनी शाहिदच्या क्रिकेटबद्दल माहिती घेतली. त्यानंतर ३ वर्षीय शाहिदला बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षणाचे आश्वासन मिळाले आहे.

दिग्गजांनी केले कौतुक

दरम्यान शाहिदचे अफलातून शॉट्स पाहून क्रिकेटमधील दिग्गजांनीसुद्धा त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. यामध्ये भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली, सौरव गांगुली यांप्रमाणेच इंग्लंडचा क्रिकेटपटू केविन पीटरसन याने देखील शाहिदचे कौतुक केले आहे. एवढेच नाही तर त्याला भारतीय संघात घेण्यात यावे असेदेखील पीटरसनने म्हटले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -