घरदेश-विदेशशबरीमालाबाबत पुजाऱ्याचं मोठं विधान

शबरीमालाबाबत पुजाऱ्याचं मोठं विधान

Subscribe

आम्ही मंदिर बंद ठेवणार नाही. पण, मंदिरप्रवेशासाठी महिलांनी देखील येऊ नये असे शबरीमाला मंदिर पुजाऱ्यानं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देखील सध्या शबरीमालामध्ये महिलांना मंदिर प्रवेशासाठी विरोध होत आहे.

केरळमधील शबरीमाला मंदिरामध्ये १० ते ५५ वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यावरून मोठा वाद सुरू झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने १० ते ५५ वयोगटातील महिलांना शबरीमाला मंदिरामध्ये प्रवेशास मुभा दिल्यानंतर आता स्थानिक भाविकांना त्याला विरोध दर्शवला आहे. त्यावरून पत्रकारांना देखील मारहाण झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. सध्या शबरीमाला मंदीर प्रवेशावरून केरळमध्ये महिला भाविकांनी देखील ही आमची पंरपरा असल्याचे म्हणत महिलांच्या प्रवेशाला विरोध केला आहे. त्यावरून आता मंदिर पुजाऱ्यानं देखील मोठ विधान केलं आहे. आम्ही मंदिर बंद ठेवणार नाही. पण, मंदिरप्रवेशासाठी महिलांनी देखील येऊ नये असे मंदिर पुजाऱ्यानं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाविकांनी मात्र न्यायालयाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

वाचा – का दिला जात नव्हता शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश?

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी

दरम्यान शबरीमाला मंदिरामध्ये १० ते ५५ वयोगटातील महिलांना प्रवेश करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर स्थानिकांनी मात्र त्याला विरोध केला. ही आमची परंपरा आहे. त्यामध्ये हस्तक्षेप नको असे भाविकांचं म्हणणं आहे. यामध्ये महिला भाविकांची संख्या देखील लक्षणीय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर केरळमध्ये ठिकठिकाणी प्रदर्शनं देखील झाली.

- Advertisement -

तृप्ती देसाईंचं आंदोलन

शबरीमाला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश देण्यावरून सध्या विरोध होत आहे. त्यावरून आता भूमिका ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई देखील आक्रमक झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीमध्ये आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देखील महिलांना शबरीमालामध्ये प्रवेश का दिला जात नाही? यासाठी रास्तारोकोच्या पवित्र्यात असलेल्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वाचा – मोदींच्या भेटीसाठी निघालेल्या तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीमध्ये

साईसमाधीला १०० वर्षे झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत.यावेळी विविध कार्यक्रमाचं भूमिपूजन देखील होणार आहे.

वाचा – शबरीमाला मंदिराचा निर्णय शिवसेनेला अमान्य; केरळमध्ये पुकारला ‘बंद’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -