घरCORONA UPDATEजगात आतापर्यंत ६ लाख ७६ हजारांहून अधिक मृत्यू; २४ तासात २ लाख...

जगात आतापर्यंत ६ लाख ७६ हजारांहून अधिक मृत्यू; २४ तासात २ लाख ८० हजार नवे रूग्ण

Subscribe

जगातील सर्वाधिक संक्रमित रूग्ण संख्येत भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे, तर मृत्यू झालेल्यांमध्ये पाचव्या क्रमांकावर

जगभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आतापर्यंत जगातील २१३ देश या जागतिक महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. अमेरिका, ब्राझील, भारत यासारख्या देशांत कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत जगभरात २ लाख ८० हजार नवीन रूग्णांची नोंद करण्यात आली आहे तर ६ हजार २२१ लोक मरण पावले आहेत.

वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत १ कोटी ७४ लाखांहून अधिक कोरोना बाधित आढळले तर ६ लाख ७६ हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ कोटी ९ लाखांवर पोहोचली आहे. सध्या जगभरात ५८ लाख ५५ हजार अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

१८ देशांत बाधितांचा आकडा २ लाखांवर

जगातील १८ देशांमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या २ लाखांच्या पार गेली आहे. यामध्ये इराण, पाकिस्तान, तुर्की, सौदी अरेबिया, इटली, जर्मनी आणि बांगलादेशचा समावेश आहे. जगातील सर्वाधिक संक्रमित रूग्ण संख्येत भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे, तर मृत्यू झालेल्यांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.

भारत तिसर्‍या क्रमांकावर

अमेरिकेत कोरोनाचा कहर सर्वाधिक असून कोरोना रूग्णांच्या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ४ कोटी ६३ लाख ४ हजार ९८५ आहे तर १ लाख ५५ हजारांहून अधिकांचा बळी गेला आहे. त्यानंतर ब्राझील या देशाचा नंबर लागतो. तेथे २ कोटी ६१ लाख ३ हजारांहून जास्त जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे तर ९१ हजार ३७७ जणांचा बळी गेला आहे. तर भारतात सध्या १ कोटी ६३ लाख ९ हजार ३५० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर ९१ हजार ३७७ जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे.


हेही वाचा- आयपीएल अंतिम सामना ८ ऐवजी १० नोव्हेंबरला?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -