घरदेश-विदेशजगात सर्वात आधी Corona Vaccine घेणाऱ्या विल्यम शेक्सपिअर यांचा मृत्यू

जगात सर्वात आधी Corona Vaccine घेणाऱ्या विल्यम शेक्सपिअर यांचा मृत्यू

Subscribe

गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोनाच्या संकटात सापडलं आहे. कोरोनाच्या महामारीपासून सुटका होण्यासाठी अनेक वैज्ञानिकांनी अखंड मेहनत घेऊन कोरोनाी लस विकसित केली. दरम्यान, कोरोनाची सर्वात पहिली लस घेणाऱ्यांपैकी असणाऱ्या विल्यम शेक्सपिअर नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ८१ वर्षांच्या शेक्सपिअर यांना ८ डिसेंबर रोजी फायझर-बायोएनटेकच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. तसेच शेक्सपियर हे अन्य आजाराने ग्रस्त होते.

जगात कोरोना लसीचा पहिला डोस घेणारा व्यक्ती

मिळालेल्या माहितीनुसार, जगात कोरोना लसीचा पहिला डोस घेणारे विलियम हे सर्वात पहिले पुरुष होते. विलियम यांच्या काही मिनिटांआधी इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी हॉस्पीटल कॉनव्हेंट्रीमध्ये ९१ वर्षीय मार्गरेट कीनन यांनी कोरोनाची लस घेतली होती, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने त्यांच्याबद्दल प्रसिद्ध केले. कोरोना लसीच्या क्लिनिकल ट्रायलदरम्यान या दोघांनाही लसीचे डोस देण्यात आल्याचे सांगितले जाते.

- Advertisement -

शेक्सपियर यांचे स्ट्रोकमुळे निधन

युनिव्हर्सिटी हॉस्पिटलने सांगितले की, शेक्सपियर यांचे स्ट्रोकमुळे निधन झाले. त्यांनी अनेक दशके आपल्या समाजासाठी काम केले. शेक्सपियर यांच्याकडे पॅरिश कौन्सिलरचीही जबाबदारी होती. त्यांना युनिव्हर्सिटी हॉस्पीटल कॉनव्हेंट्रीमध्ये लस घेण्यासाठी आणण्यात आले आणि त्यांनी तेथेच अखेरचा श्वास घेतला. पहिल्या डोसच्या वेळी त्यांनी रुग्णालयाची प्रशंसा केली होती आणि असेही सांगितले की इथले कर्मचारी खूप चांगले आहेत. कोरोनाची पहिली लस घेणारी व्यक्ती म्हणून त्यांची प्रसारमाध्यमांनी दखल घेतली. त्यांनी मागील अनेक दशकांमध्ये केलेल्या कामासाठी ते कायम लक्षात राहतील, असे शेक्सपिअर सदस्य असणाऱ्या वेस्ट मिडलॅण्ड्स लेबर ग्रुपने ट्विटरवरुन देखील म्हटले आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -