घरदेश-विदेशस्मार्टफोननंतर येणार शाओमीचा 'स्मार्ट शूज'

स्मार्टफोननंतर येणार शाओमीचा ‘स्मार्ट शूज’

Subscribe

स्मार्टफोननंतर आता लवकरच शाओमीचा 'स्मार्ट शूज' लॉंज करण्यात येणार आहे.

भारतीय स्मार्टफोन बाजारात स्वस्त आणि मस्त अशी ओळख असलेल्या शाओमीच्या स्मार्टफोननंतर आता लवकरच शाओमीचा ‘स्मार्ट शूज’ लॉंज करण्यात येणार आहे. चिनची कंपनी शाओमीने याबाबत अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची माहिती दिली आहे. ट्विटर हँडलवरुन केलेल्या ट्विटमुळे शाओमीच्या बुटांबाबत चर्चा सुरु आहे. ट्विटमध्ये बुटांचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे, त्यासोबत ‘Ready to put ypur#best foot forward’, असा संदेश दिला आहे.
शाओमी कंपनी चिनमध्ये आधीपासून ‘मिजिया’ स्मार्ट शूज विकत आहे. चीनमध्ये २०१७ साली या कंपनीने हे शूज लॉंज केले होते. त्यानंतर गेल्यावर्षी ‘मिजिया स्नीकर्स २’ लॉंज केले होते. तसचे आता हे शूज भारतात देखील लॉंज केले जोण्याची शक्यता आहे. तसेच काही माध्यमांतील वृत्तानुसार, कंपनी ‘मिजिया स्नीकर्स २’ हेच शूज Mi Sports Shoes म्हणून भारतात येत्या आठवड्यात लॉंज करण्याची शक्यता आहे.

ही आहे बूटाची किंमत

शाओमी कंपनीच्या बुटाची किंमत अंदाजे ३ हजार रुपये असू शकते. चीनमध्ये हे बूट चार रंगांमध्ये उपलब्ध असून २ हजार १०० रुपयांच्या आसपास ही किंमत आहे. भारतातही हे बूट ब्लॅक, फ्लोरल ब्ल्यू, फ्लोरल ग्रे आणि व्हाइट रंगामध्ये उपलब्ध केले जाऊ शकतात.

- Advertisement -

२५८ ग्राम वजनाचा बूट

हे बूट ‘५ इन वन यूनिमोल्डिंग प्रोसेस’ ने बनवण्यात आले आहेत. तसेच हा बूट बनवण्यासाठी पाच वेगवेगळे मटेरिअल वापरले आहे. तसेच या बूटाचे वजन २५८ ग्राम इतके आहे. त्याचप्रमाणे हे बूट वॉशिंग मशिनमध्येही धुता येतील, असा कंपनीचा दावा आहे. या बुटांमध्ये अनेक आधुनिक फीचर्स दिल्याचं सांगितल आहे.

- Advertisement -

वाचा – शाओमी फोनचे नवे फिचर भारतात लॉन्च

वाचा – जगातील पहिला ५ जी शाओमी स्मार्टफोन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -