घरताज्या घडामोडीvaccine for children: योगी सरकारचा मोठा निर्णय, लहान मुलांना मिळणार लसीचे तीन...

vaccine for children: योगी सरकारचा मोठा निर्णय, लहान मुलांना मिळणार लसीचे तीन डोस

Subscribe

देशात कोरोना आणि कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगाने लसीकरण सुरू आहे. सध्या लहान मुलांच्या लसीकरणासाठी सर्वत्र मागणी केली जात आहे. यादरम्यान उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने लहान मुलांच्या लसीकरणाला मंजूरी देऊन मोठा निर्णय घेतला आहे. १२ ते १८ पेक्षा कमी वय असलेल्या मुलांना झायकोव-डी लस देण्यासाठी योगी सरकारने मंजूरी दिली आहे. ही लस उत्तर प्रदेशातील गोरखपूरसह ११ जिल्ह्यांमध्ये दिली जाणार आहे.

देशात तिसऱ्या लाटेचा धोका वाढत आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात कोरोना केसेस वाढत आहेत. यादरम्यान उत्तर प्रदेश सरकारने लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील १८ वर्षाहून कमी वय असलेली लहान मुले १९ लाखांहून अधिक आहेत. सध्या सर्वात जास्त धोका १८ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना आहे, कारण ते घराबाहेर खेळत असतात.

- Advertisement -

१६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरण सुरू झाले. या लसीकरणाचा तिसरा टप्पा ३१ डिसेंबरला पूर्ण होईल. आरोग्य विभागाला ३५ लाख लोकांना लसीचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत जवळपास २५ लाख ५२ हजार लोकांना लसीचा पहिला डोस दिला गेला आहे. तर १५ लाख लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

आता नुकतेच आरोग्य विभागाने झायडस आणि कॅडिलाकडून विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लस झायकोव-डीला मंजूरी दिली आहे. ही लस १२ वर्षापासून ते १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना दिली जाऊ शकते. एका मुलाला या लसीचे तीन डोस मिळतील. यासाठी आजारी, दिव्यांग मुलांचा शोध सुरू केला आहे.

- Advertisement -

लसीकरणाचे नोडल अधिकारी डॉ. एनके पांडे म्हणाले की, उत्तर प्रदेश सरकार लस खरेदी करत आहे. ही लस घेताना जास्त वेदना होणार नाहीत. हा डोस घेण्याबाबत अजून कोणत्या गाईडलाईन्स आल्या नाहीत. तसेच एकदा प्रशासनाकडून रंगीततालीम घेतली होती, ज्यामध्ये प्रौढांना झायकोव-डी देण्याचे प्रशिक्षण दिले गेले होते. दरम्यान लहान मुलांचे लसीकरण सुरू करण्यापूर्वी गाईडलाईन्स काढली जाईल.


हेही वाचा – Omicron Variant: मुंबईकरांना दिलासा! १४ ओमिक्रॉनबाधितांपैकी १३ रुग्ण निगेटिव्ह


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -