घरदेश-विदेशइन्कम टॅक्सची नोटीस येणार का? आता सांगणार पॅन कार्ड

इन्कम टॅक्सची नोटीस येणार का? आता सांगणार पॅन कार्ड

Subscribe

मागच्या वित्तीय वर्षाचं इन्कम टॅक्स भरण्याची तारीख जवळ येत आहे. आयकर विभागाकडून नोटीस तर येणार नाही ना? याची पण चिंता लोकांना सतावत असते. दरम्यान कोणाला नोटीस पाठवायची आहे? याची तयारी आयकर विभागानंही सुरु केली असेल. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही नोटीस आपल्याला येणार की नाही? हे कसं कळणार? अजिबात घाबरून जाऊ नका. याची एक सोपी पद्धत आहे. तुमच्याजवळ असणाऱ्या पॅन कार्डामुळं तुम्ही ही माहिती मिळवू शकता.

पॅनवरून कळतं टॅक्स प्रोफाईल

आपलं पॅन आपली टॅक्स प्रोफाईल दर्शवतो. केंद्र शासन आपल्या पॅन नंबरवरून काही मिनिटांमध्येच टॅक्स प्रोफाईल तपासू शकतं आणि तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू शकता की नाही याचा तपास लावू शकतं. यानंतर शासन तपास सुरु करून तुमचं किती उत्पन्न आहे हे जाणून घेतं.

- Advertisement -

नोटीस येणार की नाही कसं तपासणार?

आयकर विभागाची वेबसाईट https://www.incometaxindia.gov.in वर जाऊन तुमच्या रिटर्न प्रक्रियेला सुरुवात झाली आहे की नाही हे तपासू शकता. तुम्ही रिटर्न फाईल केलं असेल आणि तरीही तुमची रिटर्न प्रक्रिया सुरु झाली नसल्यास, तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस येऊ शकते. वेबसाईटवर जाण्यासाठी तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड असणं गरजेचं आहे. तुमच्याजवळ आयडी नसल्यास, वेबसाईटवर स्वतःला नोंदणीकृत करावं लागेल.

टॅक्स रिटर्न रेकॉर्ड चेक करावा

आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा कोणताही इन्कम टॅक्स प्रलंबित नाही ना हेदेखील तपासू शकता. नियमानुसार, आयकर रिटर्न फाल करणं आवश्यक आहे. जर तुम्ही रिटर्न फाईल केलं आहे आणि इन्कम टॅक्स विभागाच्या रेकॉर्डमध्ये हा प्रलंबित दाखवत असल्यासदेखील आयकर विभागाकडून तुम्हाला नोटीस येऊ शकते. तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न का फाईल करत नाही? असा प्रश्न या नोटीसमध्ये विचारण्यात येतो.

- Advertisement -

आपला टीडीएस असा तपासावा?

इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपला फॉर्म २६ एएस पाहू शकता. हा फॉर्म आपल्या पॅनच्या रकमेवर असणारी वजावट केलेल्या टीडीएसची माहिती देतो. यावरून तुम्हाला आपला टीडीएस किती कापला आहे आणि आपण किती टॅक्स भरायला हवा याचा अंदाज येतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -