घरदेश-विदेशघरबसल्या करा What's App वरून गॅस सिलेंडरची बुकींग!

घरबसल्या करा What’s App वरून गॅस सिलेंडरची बुकींग!

Subscribe

प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. मात्र हा सिलेंडर बुक करण्यासाठी आता एजन्सीकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा गॅस सिलेंडर घर बसल्या देखील स्मार्टफोनवरून बुक करू शकतात. यापूर्वी कॉल करून आयव्हीआरद्वारे सिलेंडर बुक करता येत होते, परंतु आता इन्स्टंट मेसेजिंग व्हॉट्सअॅपद्वारे देखील बुक करता येणार आहे. जर तुम्हाला व्हॉट्सअॅपद्वारे सिलेंडर कसे बुक करायचा असेल तर जाणून घ्या प्रक्रिया…

असं करा बुकिंग

जर तुम्ही इंडेन कंपनीचे ग्राहक असाल तर एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंगसाठी 7718955555 या क्रमांकावर कॉल करू शकता. त्याचबरोबर तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे सिलेंडर बुक करू शकता. यासाठी तुम्हाला 7588888824 वर REFILL लिहून व्हॉट्सअॅपवर मेसेज करावा लागेल. ग्राहकाला त्याच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरूनच मॅसेज पाठवणं बंधनकारक असणार आहे.

- Advertisement -

एचपी कंपनीचे ग्राहक असाल तर…

तुम्ही एचपी कंपनीचे ग्राहक असाल तर एलपीजी गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी 9222201122 या क्रमांकावर कॉल किंवा तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे सिलेंडर बुक करू शकता. यासाठी तुम्हाला 9222201122 वर WhatsApp वर BOOK लिहून मॅसेज पाठवावा लागणार आहे. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरूनच मॅसेज पाठवणं आवश्यक असेल तसेच ग्राहकांना सब्सिडीची माहितीही उपलब्ध करता येईल.

भारत कंपनीचे ग्राहक आहात?

जर तुम्ही भारत गॅस कंपनीचे ग्राहक असाल तर एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंगसाठी 1800224344 क्रमांकावर कॉल करू शकता. त्यानंतर तुम्ही 1 नंबर दाबून सिलेंडर बुक करू शकता. यानंतर तुमची बुकिंग विनंती स्वीकारली जाईल आणि तुम्हाला व्हॉट्सअॅपवर सिलेंडर बुकिंग केल्याचा अलर्ट मिळेल.


कोरोना महामारीमुळे दुसऱ्यांदा आई होण्यास महिलांकडून टाळाटाळ!

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -