घरदेश-विदेशजगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे प्रमुख 'जियोन-ए' निधन, कुटूंबातील सदस्यांचा अंत्यसंस्कार करण्यास नकार

जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे प्रमुख ‘जियोन-ए’ निधन, कुटूंबातील सदस्यांचा अंत्यसंस्कार करण्यास नकार

Subscribe

बक्तांगमध्ये जियोन-ए यांची चार मजली हवेली एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.

मिझोरमा येथिल जगातिल सर्वात मोठ्या कुटूंबातिल (World Biggest Family) मुख्य सदस्य जियोनघाका उर्फ ​जियोन-ए यांनी जगाचा निरोप घेऊन जवळ-जवळ 36 तास पालटले आहेत. पण त्यांचे प्रियजन त्यांना निरोप देण्यास अद्याप तयार नाहित. कारण त्यांना वाटत आहे की ते अजूनहि जिवंत आहेत. बक्तांग गावामध्ये 76 वर्षीय जियोनघाका यांच्या 39 बायका आहेत,तसेच 90 पेक्षा अधिक मुलं आहेत . 33 नातवंड असा भला मोठा गोतावळ आहे. तसेच हे संपुर्ण कुटूंब एका चार मजलि इमारतीमध्ये स्थायिक आहेत. हा परिवार एका धार्मिक संप्रदाय लाल्पा कोहरान थार याच्याशी संबधीत आहे. आणि संप्रदायमध्ये पुरुषांना बहुविवाह करण्याची अनुमति दिली आहे.उच्च रक्तदाब आणि मधुमेह आजाराने ग्रस्त जियोन-ए यांना रविवार आइजोल मधिल ट्रिनिटी रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. पण परिवारातील सदस्य जियोन-ए हे मृत आहेत हे माणण्यास अजिबात तयार नाहित.

त्यांच्या मते जियोन-ए यांचे शरीर गरम आहे तसेच त्याची नसा देखिल चालू आहेत. लाल्पा कोहरान थार मधिल सचिव जैतिनखुमा यांनी सांगितले आहे की रुग्णालयातून घरि आणल्यानंतर जियोन यांची नाड़ी पुन्हा सुरु झाली. तसेच ते पुढे म्हणाले ” त्यांचे शरीर गरम आहे.त्यांच्या परिवारातील सदस्य आणि बक्तांग गावामधिल चुआंथार लोकं त्यांना अशा परिस्थितीत त्यांचे अंतिम संस्कार करण्यास तयार नाहित.” चुआंथार ग्राम परिषद अध्यक्ष रामजुआवा यांच्या मते, 433 परिवारातील 2,500 पेक्षा अधिक सदस्य संप्रदायचा भाग आहेत. आणि याची स्थापना 70 वर्षांपुर्वी जियोन-ए च्या चुलत्यांनी केली होती. संप्रदायमधील सदस्य सुतार काम करतात. परिवारातील प्रत्येक सदस्य त्यांचा खुप आदर करतात. जोपर्यंत त्यांना पुर्ण खात्री होत नाहि की जियोन आता या जगात नाहि तो पर्यंत ते अंतिम संस्कार करणार नाहि” मुख्यमंत्री जोरमथांगा यांनी रविवार जियोन-ए यांच्या निधनावर आपल्या संवेदना प्रकट करत ट्वीट केलं होतं, ” मिजोरमने मिस्टर जियोन-ए (76), ज्यांना जगातिल सर्वात मोठ्या कुटूंबाचे प्रमुख माणले जाते,निरोप … त्यांच्या आत्मास शांती लाभो. ”

- Advertisement -

प्रदेश कांग्रेस अध्यक्ष ललथनहवला आणि जोरम पीपुल्स मूवमेंट (जेडपीएम) नेता लालदुहोमा सहित अन्य लोकांनी सुद्धा जियोन-ए निधनामुळे दु:खी झाले आहेत. बक्तांगमध्ये जियोन-ए यांची चार मजली हवेली एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.


हे हि वाचा – LGP मध्ये मोठी उलथापालथ; पाच बंडखोर खासदारांनी चिराग पासवान यांनाच गटनेतेपदावरुन हटवलं

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -