घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धालहानपणीच्या खेळांची आठवण करुन देणारा संतोष पाटील यांचा बाप्पा

लहानपणीच्या खेळांची आठवण करुन देणारा संतोष पाटील यांचा बाप्पा

Subscribe

भाईंदर येथील संतोष पाटील हे आपल्या घरी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत आहेत. यावर्षी पाटील यांनी खेळ मांडीयेला ही संकल्पनेवर सजावटीचा देखावा केला आहे. ९० च्या आसपास जन्मलेल्या पिढीने जे खेळ लहानपणी खेळले आहेत, ते खेळ हल्लीची पिढी खेळत नाही. मोबाईल, स्मार्टफोन,व्हिडिओ गेममुळे कुठेतरी बुद्धीबळ, कॅरम, भवरा, व्यापार असे घरगुती खेळ आता मागे पडले आहेत. मोबाईलच्या युगात लोप पावलेल्या बोर्ड गेम्सबद्दल आजच्या नवीन पिढीला जागृत करण्यासाठी पाटील यांनी ही कल्पना राबवली आहे.

बाप्पांच्या मुर्तीच्या मागे 3D स्वरूपात मोठी सापशिडी करण्यात आली आहे आणि lighting आणि sensors चा वापर करून ती खेळता सुद्धा येते. बाप्पा बुद्धीचा देवता असल्यामुळे बाप्पाला मोठ्या बुद्धिबळावर स्थापित केले आहे. मोठे chess pieces सुद्धा ठेवले आहेत. कॅरमच्या सोंगट्यांचे तोरण, पत्त्यांचे टॉवर, भवरा, भिंगाऱ्यांचे विविध प्रकार, UNO, व्यापार, LUDO तसेच सारी पाट (Pachisi) अश्या विविध बोर्ड गेम्सने बाप्पाची आरास केली आहे.

- Advertisement -

संतोष पाटील यांनी साकारलेला हा देखावा संपुर्णतः पर्यावरणपूरक तर आहेच, शिवाय सर्वांनाच अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा सुद्धा आहे.


 

- Advertisement -

स्पर्धकाचे नाव – संतोष नंदकुमार पाटील

पत्ता : A /३०४, डी बिल्डिंग, सुजाता शॉपिंग सेन्टर, नवघर रोड,
भाईंदर (पूर्व) ठाणे – ४०११०५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -