घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धादत्तात्रय चिव्हाणेंचा बाप्पा देतोय "आरोग्यम् धनसंपदा"चा संदेश

दत्तात्रय चिव्हाणेंचा बाप्पा देतोय “आरोग्यम् धनसंपदा”चा संदेश

Subscribe

ठाण्यातील दत्तात्रय चिव्हाणे यांच्या घरी देखील पर्यावरण पूरक गणेशाची प्रतिष्ठापना होत असून आमच्या गणपती बाप्पाचे ५० वे वर्ष (अमृत महोत्सव ) असल्यामुळे आम्ही या वर्षी “आरोग्यम् धनसंपदा” ही थिम घेतली असल्याचे ते सांगतात. पुढे चिव्हाणे सांगतात की, पन्नास वर्षानंतर आपले आरोग्य जपणे महत्त्वाचे असते (आरोग्य हीच संपत्ती). ५० व्या वर्षानिमित्त आरोग्याकरता सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आरोग्य चांगले राहण्याकरता ५० स्टीम दिल्या आहे.  गणपती बाप्पाची मूर्तीसुद्धा इको फ्रेंडली शाडू मातीने घरीच बनवली आहे. मूर्तीमध्ये सुद्धा गणपती बाप्पा आपल्या लाडक्या उंदीर मामाच्या आरोग्याची काळजी घेताना दाखवले आहे. गणपती बाप्पा उंदीर मामाला मावळ्याचा मोदक न देता उकडीचे मोदक देतात जो आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे. आम्ही गार्डन (जॉगिंग पार्क) मॉडल बनवला आहे त्यामध्ये जॉगिंग ट्रॅक, एक्सरसाइज मशीन, झाडे दाखवली आहे. त्यामध्ये जॉगिंग करताना व्यायाम करणारे माणसं दाखवली आहेत. मूर्तीसोबत संपूर्ण देखावा इको फ्रेंडली आहे आणि या देखाव्यासाठी आम्ही कापड, पेपर, पुठ्ठा या गोष्टी वापरल्या आहेत.


हे वाचा –  इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहिती

- Advertisement -

स्पर्धकाचे नाव : दत्तात्रय चिव्हाणे
पत्ता : ए /५०१, मनोबल को. हा. सो. लि., सावरकर नगर, आई माता मंदिर जवळ, ठाणे पश्चिम, ४००६०६


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -