घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाओंकार लिंगायत यांनी देखाव्यात साकारली कोल्हापूरची अंबाबाई!

ओंकार लिंगायत यांनी देखाव्यात साकारली कोल्हापूरची अंबाबाई!

Subscribe

गिरगावच्या राजाचं प्रतिरूप असलेली गणेशमूर्ती तर इको-फ्रेंडली आहेच, शिवाय त्यांनी महालक्ष्मीची मूर्तीही स्वत: बनवली आहे. लिंगायत यांच्या घरी गेल्या ४० वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होतो. तर मागच्या १० वर्षांपासून त्यांनी इको फ्रेंडली गणेशोत्सवाची कास धरली आहे. पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता आपले सण आपण साजरे करायला हवेत, अशा उदात्त हेतूने त्यांनी इको फ्रेंडली गणेशोत्सवाची निवड केली आहे.

कोल्हापूरची अंबाबाई म्हणजे समस्त महाराष्ट्रासाठी मोठ्या श्रद्धेचा विषय! त्यातही लाडक्या गणरायावर सगळ्यांचीच श्रद्धा. गिरगावच्या चर्नी रोड परिसरात राहणाऱ्या ओंकार लिंगायत यांनी महाराष्ट्राची हीच दोन्ही श्रद्धास्थानं एकाच छताखाली आणली आहेत. त्यांच्या श्रीजी सदनमधल्या फ्लॅटमध्ये त्यांनी चक्क कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा गाभाराच उभा केला आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे संपूर्ण डेकोरेशन त्यांनी रोजची वर्तमानपत्र आणि पुठ्ठ्याचा वापर करून केलं आहे. त्यांची गिरगावच्या राजाचं प्रतिरूप असलेली गणेशमूर्ती तर इको-फ्रेंडली आहेच, शिवाय त्यांनी महालक्ष्मीची मूर्तीही स्वत: बनवली आहे. लिंगायत यांच्या घरी गेल्या ४० वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होतो. तर मागच्या १० वर्षांपासून त्यांनी इको फ्रेंडली गणेशोत्सवाची कास धरली आहे. पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता आपले सण आपण साजरे करायला हवेत, अशा उदात्त हेतूने त्यांनी इको फ्रेंडली गणेशोत्सवाची निवड केली आहे.

Onkar Lingayat Decoration
ओंकार लिंगायत यांच्या घरी कोल्हापूरच्या लक्ष्मी मंदिराचा देखावा

जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट बद्दल

- Advertisement -

माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करु शकता.


तुमचे सेल्फी अपलोड करण्यासाठी क्लिक करा… 

- Advertisement -

तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -