घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धासुदृढ आरोग्याचा मंत्र सांगणारा गणपती बाप्पा

सुदृढ आरोग्याचा मंत्र सांगणारा गणपती बाप्पा

Subscribe

‘गणपती बाप्पा मोरया, तब्येतीची काळजी घ्या’, असा नारा देत पिंपरी चिंचवड येथील स्नेहा कर्ले आणि आदित्य सहस्रबुद्धे यांनी सुदृढ आरोग्याचा मंत्र देणारा गणपत्ती बाप्पा आपल्या घरी साकारला आहे. त्यांचा बाप्पा पिळदार शरीराचा आणि सिक्स पॅक अॅब्स असलेला आहे. आरोग्य या संकल्पनेवर स्नेहा आणि आदित्य यांनी संपूर्ण देखावा सजवला आहे. व्यायाम आणि सकस आहाराचे महत्त्व सर्वांना समजावे आणि त्याची अंमलबजावणी व्हावे, यासाठी आम्ही हा देखावा केला असल्याचे आदित्य यांनी सांगितले आहे. “माझे पती आदित्य सहस्रबुद्धे हे मल्लखांब खेळात राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू राहिलेले आहेत. लहानपणी सलग सहा वर्ष ते मल्लखांबचे चॅम्पियन होते”, अशी माहिती स्नेहा कर्ले यांनी दिली.

व्यायामाचे महत्त्व सांगणारी ही मूर्ती शाडूच्या मूर्तीपासून बनवलेली आहे. कुरियरने आलेल्या वस्तूंच्या पुठ्ठ्यापासून सजावट करण्यात आली आहे. लाल माती आणि फुलांचा वापर देखील करण्यात आली आहे.

- Advertisement -

पिंपरी चिंचवडचे हे दांम्पत्य मुळचे मुंबईचे आहे. त्यामुळे त्यांनी लहानपणापासून गणेशोत्सव जवळून पाहिला आहे. विसर्जनानंतर चौपाटीवर होणारी मूर्त्यांची दुर्दशाही पाहिलेली आहे. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या वस्तू वापरल्यामुळे देव आणि वंसुधरेचाच आपण अपमान करत आहोत. त्यामुळेच इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचा आम्ही निर्णय घेतला तसेच आध्यात्मिक अनुभवासाठी मूर्तीही स्वतःच्या हातानेच साकारण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्नेहा आणि आदित्य यांनी सांगितले.


जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा कान्टेस्ट बद्दल

- Advertisement -

माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करू शकता.


तुम्हाला हे माहिती आहे का? – डीजे आणि डॉल्बीच्या आवाजावरील बंदी कायम


तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -