घरसंपादकीयदिन विशेषप्रसिद्ध नाटककार गोविंद बल्लाळ देवल

प्रसिद्ध नाटककार गोविंद बल्लाळ देवल

Subscribe

गोविंद बल्लाळ देवल यांचा आज स्मृतिदिन. गोविंद बल्लाळ देवल हे प्रसिद्ध नाटककार आणि नाट्यदिग्दर्शक होते. त्यांचा जन्म १३ नोव्हेंबर १८५५ रोजी सांगलीतील हरिपूर येथे झाला. त्यांचे मराठी शिक्षण प्राथमिक शाळेत आणि संस्कृतचे अध्ययन खासगीरित्या हरिपूरला झाले. कोल्हापूर व बेळगाव येथे माध्यमिक शिक्षण होऊन १८७८ मध्ये ते मॅट्रिक झाले. बेळगावच्या रहिवासात सुप्रसिद्ध नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्याशी त्यांचा दाट परिचय झाला. पुढे पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजातील शेतकी शिक्षणवर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी १८८० मध्ये प्रमाणपत्र मिळविले. सांगलीचा नाट्यानुकूल परिसर, वडीलबंधू संगीतशास्त्रज्ञ, दुसरे बंधू हे कुशल नट आणि किर्लोस्करांसारखे मुरब्बी नाट्यगुरू असे त्यांच्या भोवतालचे वातावरण नाट्याला पोषक होते. साहजिकच अल्पकाळ शिक्षकाचा व्यवसाय केल्यावर देवलांनी हयातभर नाट्यसेवेला वाहून घेतले. १८८० मध्ये किर्लोस्कर नाटक मंडळी स्थापन झाली.

किर्लोस्कर पद्धतीची नाट्यपदे रचण्यात देवल कुशल होते. किर्लोस्करांच्या शाकुंतलातील शकुंतलेची पदे देवलांनी रचली आणि त्या मंडळीचे ते आधारस्तंभच बनले. देवलांनी इंग्रजीवरून 3, संस्कृतवरून 3 व एक स्वतंत्र अशी एकूण 7 नाटके रचली. ‘दुर्गा’ (१८८६), शेक्सपिअरकृत ऑथेल्लोची रंगावृत्ती ‘झुंझारराव’ (१८९०), ‘ऑल इन द राँग’ आणि गॉनारेल या नाटकांवरून ‘फाल्गुनराव’ अथवा ‘तसबिरीचा घोटाळा’ (१८९३) ही त्यांची परकीय नाट्यकृतींची रूपांतरे होत. अत्यंत प्रयोगक्षम नाट्यकृतींचे लेखन आणि स्वाभाविक अभिनयशिक्षण या द्विविध प्रकारे रंगभूमीशी तादात्म्य पावून त्यांनी जी रंगभूमीची सेवा केली, ती चिरंतन स्वरूपाची आहे. अशा या प्रसिद्ध नाटककाराचे १४ जून १९१६ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -