घरसंपादकीयदिन विशेषजागतिक बालकामगार विरोधी दिन

जागतिक बालकामगार विरोधी दिन

Subscribe

 

 

- Advertisement -

संपूर्ण जगभरात बालकामगार विरोधी दिन दरवर्षी 12 जून रोजी पाळण्यात येतो. बालमजुरीला आळा घालण्यासाठी बालकामगार प्रथा कायमची बंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात समाजामध्ये सामाजिक जागृती घडून यावी याकरिता 12 जून 2002 पासून जागतिक कामगार संघटनेच्या वतीने बालकामगार विरोधी दिनाची सुरुवात करण्यात आली. संपूर्ण जगभरात जागोजागी सुरू असलेल्या बालमजुरी, बालकामगार प्रथेवर समाजाचे लक्ष केंद्रित करण्याकरिता आणि त्यावर कायमस्वरूपी आळा घालण्याच्या उद्दिष्टासाठी जागतिक बालकामगार विरोधी दिवस पाळला जातो. 14 वर्षांखालील जी मुले स्वत:च्या आणि आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी, रोजगार कमवितात त्यांना बालकामगार म्हणतात. ज्या वयात शाळेत जावून शिकायचे, खेळायचे, बागडायचे त्या वयात हातात झाडू घेऊन साफ-सफाई करायची, भांडी, कपडे धुवायचे, विटा उचलायच्या, दगड फोडायचे अशी अनेक कामे करावी लागतात.

या बालकामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्यावतीने जिल्हास्तरावर राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प राबविण्यात येतो. अमरावती जिल्ह्यात 2004 पासून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत 9 ते 14 वयोगटातील धोकादायक, व्यवसायामध्ये काम करणार्‍या बालकामगारांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यात येते. प्रकल्पाचा मुख्य उद्देश बालकामगारांचा त्यांच्या कामापासून परावृत्त करून शैक्षणिकदृष्ठ्या सक्षम बनविणे व त्यांच्या पालकांचा आर्थिक स्तर उंचावणे, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे. अमरावती जिल्ह्यात सध्या एकूण 37 विशेष प्रशिक्षण केंद्र विविध वस्त्यांमध्ये कार्यान्वित आहेत. प्रकल्प अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनात साधारत: 150 कर्मचारी काम करीत आहेत. या प्रकल्पांतर्गत बालकामगारांना विविध कौशल्य विकास योजनांचा लाभ मिळवून देण्यात येतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -