घरसंपादकीयदिन विशेषसमाजशास्त्रीय लेखिका डॉ. प्रतिभा रानडे

समाजशास्त्रीय लेखिका डॉ. प्रतिभा रानडे

Subscribe

डॉ. प्रतिभा रानडे या एक मराठी लेखिका आहेत. त्यांचा जन्म 20 ऑगस्ट 1937 रोजी पुण्यात झाला. त्यांचे शाळा, कॉलेजचे सर्व शिक्षण कोल्हापुरातच झाले. त्या बी.ए. आहेत. त्यांचे पती फिरोज उर्फ पंढरीनाथ रानडे हे भारत सरकारच्या सेवेत होते. त्यामुळे लग्नानंतर प्रतिभा रानडे यांना भारतभ्रमण करता आले. पतीच्या वरचेवर बदल्या होत असत. त्यामुळे कोलकाता, मणिपूर, शिलाँग, दिल्ली, अफगणिस्तान आणि आता मुंबई असा प्रवास त्यांना करावयास मिळाला. या प्रत्येक बदल्यांच्यावेळी पतीबरोबर फिरत असताना आलेले अनुभव त्यांनी त्यांच्या लेखनातून मांडले. प्रतिभा रानडे यांनी दिल्लीत असताना इन्स्टिट्यूट ऑफ जरनॅलिझमचा एक वर्षाचा अभ्यासक्रम केला आणि मग त्यातूनच त्यांची लिखाणाची आवड वाढली. त्यांचा दैनिक ‘केसरी’मध्ये दिल्लीतल्या सांस्कृतिक घडामोडींवर एक लेख छापून आला आणि त्यानंतर त्यांचे नियमित लेखन सुरू झाले.

दिल्लीतल्या ‘पुराना किल्ला’ या विषयावर प्रतिभा रानडे यांनी विस्तृत लिहिले होते. तिथून त्यांची खर्‍या अर्थाने लेखनास सुरुवात झाली. त्यांची २० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात कादंबर्‍या, समाजशास्त्रीय लेखन, चरित्रे आदींचा समावेश आहे. फक्त कथा आणि कादंबर्‍या या पद्धतीच्या चाकोरीबद्ध लेखनपद्धतीत न अडकता दरवेळी काहीतरी वेगळे लिहिण्याचा प्रयत्न करणार्‍या प्रतिभा रानडे यांच्या प्रत्येक लेखनात नावीन्य असते. त्यांचे लेखन हे संवेदना आणि कलात्मकतेचा मिलाफ असतो. ‘अखेरचा बादशहा’, ‘अनुबंध धर्म संस्कृतींचे : आर्थिक सत्ता आणि राजकारणाची धग’,‘अफगाण डायरी : काल आणि आज’, ‘अबोलीची भाषा’, ‘अमीर खुसरो : एक मस्त कलंदर’, ‘ऐसपैस गप्पा : दुर्गाबाईंशी’,‘काझी नसरूल इस्लाम : एक आर्त’, ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई (चरित्र)’,‘नल पाकदर्पण’ (संपादित),‘परकं रक्त’ (कथासंग्रह),‘पाकिस्तान अस्मितेच्या शोधात’,‘पाकिस्तान डायरी’,‘फाळणी ते फाळणी’,‘बंद दरवाजा’,‘बुरख्याआडच्या स्त्रिया : काल आणि आज’,‘मरुगान’ (ललित),‘मानुषी’ (कथा) इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -