घरसंपादकीयदिन विशेषजागतिक महासागर दिन

जागतिक महासागर दिन

Subscribe

८ जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून साजरा केला जातो. समुद्र दूषित होण्याचे प्रमाण वाढल्याने त्यासंबंधी जनजागृती करणे आवश्यक बनले आहे. यासंदर्भातला प्रस्ताव १९९२ मध्येच कॅनडाने ब्राझीलमध्ये झालेल्या वसुंधरा शिखर परिषदेत मांडला. त्याला संयुक्त राष्ट्रसंघाने २००८ मध्ये मान्यता दिली. तेव्हापासून ‘द ओशन प्रोजेक्ट’ या अमेरिकन संस्थेच्या सहकार्याने जागतिक महासागर दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होत आहे.

महासागर हे संरक्षिले जावेत आणि नैसर्गिकदृष्ठ्या असलेले त्यांचे महत्व जपले जावे असा हा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू आहे. प्राणवायू, वातावरणाचे नियमन, अन्नाचा पुरवठा, औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांचे स्थान महत्त्वाचे आहे. यानिमित्ताने व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर महासागर रक्षणाची संधी घेतली जाते. दरवर्षी एखादे ध्येय ठेवून हा दिवस साजरा केला जातो.

- Advertisement -

जागतिक महासागर दिनानिमित्ताने संयुक्त राष्ट्रांचे सर्व सदस्य देश, त्यांतील सागरी परिसंस्थेशी संबंधित संस्था, अनेक स्वयंसेवी संस्था, संशोधक-अभ्यासक मिळून समुद्राविषयीचे विविध पैलू जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतात. सर्वांनाच सागराबद्दल कुतूहल असते. अर्धी पृथ्वी जरी आपण तिच्या नैसर्गिक स्वरूपात राखू शकलो, तरी तब्बल १० लाख प्रजातींना नष्ट होण्यापासून आपण वाचवू शकतो, असा शास्त्रज्ञांचा अभ्यासपूर्ण कयास आहे.

सांडपाणी, औद्योगिक प्रदूषके, मुदत संपलेली वा घातक रसायने, प्लास्टिकच्या बाटल्या नि पिशव्या समुद्रात टाकल्या जातात. यामुळे समुद्राची परिस्थिती गंभीर बनली आहे. मासे मिळवण्यासाठी अधिकाधिक खोल समुद्रात जावे लागत आहे, पाण्याचा दर्जा घसरला आहे. हवामानावर परिणाम होत आहे. विशिष्ट सजीव नष्ट होऊ लागले आहेत. हे सारे थांबविणे हेच या दिनाचे खरे उद्दिष्ट आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -