घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

सर्वांगीं सर्वंठायीं । मीचि नमस्कारिला जींहीं । दानपुण्यादिकें जें कांहीं । तें माझियाचि मोहरां ॥
सर्वांगाने व सर्व ठिकाणी मलाच नमस्कार करितात. दाने, पुण्य वगैरे सर्व काही माझ्याच उद्देशाने करितात.
जींहीं मातेंचि अध्ययन केलें । जे आंतबाहेरि मियांचि धाले । जयांचें जीवित्व जोडलें । मजचिलागीं ॥
ज्यांनी माझे स्वरूप यथार्थ कळणार्‍या शास्त्राचेच अध्ययन केले आहे, जे माझ्याच योगाने अंतर्बाह्य तृप्त झाले आहेत, ज्यांनी आपले आयुष्य माझ्याकडेच खर्च केले आहे,
जे अहंकारु वाहत आंगीं । आम्ही हरीचे भूषावयालागीं । जे लोभिये एकचि जगीं । माझेनि लोभें ॥
ज्यांना माझ्याशिवाय दुसर्‍या कसल्याही प्राप्तीची इच्छा नाही, आम्ही हरीची कीर्ति वाढविणारे आहोत असा जे अहंकार बाळगतात.
जे माझेनि कामें सकाम । जे माझेनि प्रेमें सप्रेम । जे माझिया भुली सभ्रम । नेणती लोक ॥
जे माझ्याविषयीच्या कामनेनेच कामनायुक्त आहेत, जे माझ्याविषयीच्या प्रेमाने प्रेमयुक्त आहेत व जे माझ्याठिकाणी भुलल्यामुळे वेडे झाले आहेत, म्हणून लोकांना जाणत नाहीत.
जयांचीं जाणती मजचि शास्त्रें । मी जोडें जयांचेनि मंत्रें । ऐसें जे चेष्टामात्रें । भजले मज ॥
ज्यांची शास्त्रे तर मलाच जाणतात, जे अशा मंत्राचा जप करतात की त्यापासून त्यांना माझीच प्राप्ती होते, अशा प्रकारे ज्यांनी आपल्या कायिक, वाचिक, मानसिक या सर्व कर्मांनी माझे भजन केले,
ते मरणा ऐलीचकडे । मज मिळोनि गेले फुडे । मग मरणीं आणिकीकडे । जातील केवीं? ॥
त्यांना मरण येण्याच्या पूर्वीच माझ्या स्वरूपाशी त्याचे निश्चयेकरून ऐक्य झाले. ते मग मरणसमयी इतर गतीस कसे जातील?
म्हणौनि मद्याजी जे जाहाले । ते माझियाचि सायुज्या आले । जिहीं उपचारमिषें दिधलें । आपणपें मज ॥
याकरिता ज्यांनी अर्पण करण्याच्या निमित्ताने मला आपला आत्मभाव अर्पण केला आहे, असे माझे भजन करणारे हे आहेत ते माझ्या सायुज्य (मोक्ष) गतीस जातात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -