घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

पाहें पां शाखा पल्लव रुखाचे । हे काय नव्हती एकाचि बीजाचें?। परी पाणी घेणें मुळाचें । तें मुळींचि घापे ॥
हे पाहा, वृक्षांच्या फांद्या, पाने वगैरे एकाच बीजापासून उत्पन्न झालेली नव्हेत का? परंतु पाणी जे घालावयाचे ते मुळाशीच घातले पाहिजे.
कां दहाही इंद्रियें आहाती । इयें जरी एकेचि देहींचीं होती । आणि इहीं सेविले विषयो जाती । एकाचि ठायां ॥
किंवा दहा इंद्रिये जरी एकाच ठिकाणी जातात.
तरि करोनि रससोय बरवी । कानीं केवीं भरावी?। फुलें आणोनि बांधावीं । डोळां केवीं ॥
तरी उत्तम स्वयंपाक करून तो कानात कसा घालावा? आणि फुले आणून त्यांचा डोळ्यांनी कसा वास घ्यावा?
तेथ रसु तो मुखेंचि सेवावा । परिमळु तो घ्राणेंचि घ्यावा । तैसा मी तो यजावा । मीचि म्हणौनि ॥
तर अन्न हे तोंडानेच सेवन केले पाहिजे आणि सुवास हा नाकानेच घेतला पाहिजे, त्याचप्रमाणे माझी पूजा करणे ती माझी भावना करूनच केली पाहिजे.
येर मातें नेणोनि भजन । तें वायांचि गा आनेंआन । म्हणोनि कर्माचे डोळे ज्ञान । तें निर्दोष होआवें ॥
एर्‍हवी मला न जाणता जे भजन करणे ते काही तरी असून व्यर्थ होय. म्हणून कर्म आचरण्यास ज्ञान ही दृष्टी आहे व ते ज्ञान निर्दोष असे झाले पाहिजे.
एर्‍हवीं पाहें पां पंडुसुता । या यज्ञोपहारां समस्तां । मीवांचूनि भोक्ता । कवणु आहे? ॥
अर्जुना एर्‍हवी असे पाहा की, या सर्व यज्ञोपचारांचा माझ्यावाचून दुसरा कोण भोक्ता आहे!
मी सकळां यज्ञांचा आदि । आणि यजना या मीचि अवधि । कीं मातें चुकोनि दुर्बुद्धि । देवां भजले ॥
मी सर्व यज्ञांचा आदि आहे व यजनाचा शेवटही मीच आहे, परंतु दुर्बुद्धि जे असतात, ते मला सोडून इंद्रादी देवास भजतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -