घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

पाहतां पृथ्वीचे मोल थोडें । ऐसें अनर्घ्य रत्न चोखडें । देखे दगडाचेनि पाडें । निचाडु ऐसा ॥
ज्याचे मोल पाहू गेले असता त्यापुढे पृथ्वीचेही मोल थोडे आहे, अशा रत्नाला केवळ दगडाप्रमाणे मानण्याइतका जो निरिच्छ असतो,
तेथ सुहृद आणि शत्रु । कां उदासु आणि मित्रु । हा भावभेदु विचित्रु । कल्पू कैंचा ॥
त्याचे ठिकाणी आप्त आणि शत्रु अथवा उदासीन आणि मित्र अशा चित्रविचित्र कल्पना कोठून येणार?
तया बंधु कोण काह्याचा । द्वेषिया कवणु तयाचा । मीचि विश्व ऐसा जयाचा । बोधु जाहला ॥
मीच जग आहे, असा ज्याच्या मनात बोध झाला आहे, त्याला बंधु कोण आणि द्वेषी कशाचा?
मग तयाचिये दिठी । अधमोत्तम असे किरीटी? । काय परिसाचिये कसवटी । वानिया कीजे? ॥
मग अर्जुना, त्याच्या दृष्टीला लहान आणि थोर असा कोठून भास होणार? असे पहा की, परिसाच्या कसोटीस लागल्यावर निरनिराळे कस लागतील काय?
ते जैशी निर्वाण वर्णुचि करी । तैशी जयाचि बुद्धि चराचरीं । होय साम्याची उजरी । निरंतर ॥
ती कसोटी सर्व धातूंना उत्तम सोनेच करिते, तशी त्याची बुद्धि नेहमी चराचराचे ठिकाणी केवळ ऐक्यच जाणते.
जे ते विश्वाळंकाराचे विसुरे । जरी आहाती आनानें आकारें । तरी घडले एकचि भांगारें । परब्रह्में ॥
का म्हणशील तर विश्वरूप अलंकाराचे ठसे जरी पुष्कळ आकाराचे आहेत, तरी ते एकाच परब्रह्मरूपी सुवर्णाचे घडलेले आहेत;
ऐसें जाणणें जें बरवें । ते फावलें तया आघवें । म्हणौनि आहाचवाहाचे न झकवे । येणें आकारचित्रें ॥
असे शुद्ध व खरे तत्त्व ज्याला पूर्णपणे समजले आहे, तो चित्रविचित्र रचनेने वरचेवर फसला जात नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -