घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

ऐकें द्वैताचा ठावोचि फेडी । ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी । तरी अर्जुना पढिये हे गोडी । नासेल हन ॥
जी ब्रह्मविद्या द्वैताचा नाश करते, ती जर स्पष्ट केली, तर आपला प्रियकर असा जो अर्जुन, त्याची प्रीति नाहीशी होईल.
म्हणौनि तें तैसें बोलणें । नव्हे सपातळ आड लावणें । केलें मनचि वेगळवाणें । भोगावया ॥
म्हणून ब्रह्मज्ञानाविषयी स्पष्ट न बोलता आड पडद्याने बोलून अर्जुनाचे मन त्याच्या व आपल्या प्रेमाचा उपयोग घेण्याकरिता वेगळे ठेविले.
जया सोहंभाव अटकु । मोक्षसुखालागोनि रंकु । तयाचिये दिठीचा झणें कळंकु । लागेल तुझिया प्रेमा ॥
जे अहंब्रह्म या स्फुरणांतच अडकून मोक्षसुखाच्या प्राप्तिकरिता दीन झाले आहेत, त्यांच्या दृष्टीचा कलंक कदाचित तुझ्या ब्रह्मविद्येविषयीच्या प्रेमाला लागेल हो!
विपायें अहंभावो ययाचा जाईल । मी तेंचि हा जरी होईल । तरी मग काय कीजेल । एकलेया ॥
कदाचित अर्जुनाचा मीपणा जाऊन ‘मी तोच हा’ असे जर होईल, तर मग मी एकट्याने काय करावयाचे आहे!
दिठीचि पाहतां निविजे । कां तोंड भरोनि बोलिजे । नातरी दाटूनि खेंव दीजे । ऐसें कवण आहे ?॥
पाहिल्याबरोबर डोळे शांत होण्यास व तोंड भरून बोलण्यास किंवा आनंदाने दृढ आलिंगन देण्यास दुसरे कोण आहे!
आपुलिया मना बरवी । असमाई गोठी जीवीं । ते कवणेंसि चावळावी? । जरी ऐक्य जाहलें ॥
जर अर्जुनाचे आणि माझे ऐक्य झाले, तर आपल्या मनात न मावणारी अशी उत्तम गोष्ट ती कोणाजवळ बोलावी!
इया काकुळती जनार्दनें । अन्योपदेशाचेनि हाताशनें । बोलामाजि मन मनें । आलिंगूं सरलें ॥
अशा अडचणींमुळे श्रीकृष्णानी बोलण्यात साधूची लक्षणे सांगून उपदेश केला व त्यांचे मन वळविले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -