घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

पाठीं महर्षी येणें आले । साधकांचे सिद्ध जाहाले । आत्मविद थोरावले । येणेंचि पंथें ॥
पूर्वीचे महर्षि याच मार्गाने आले आणि ते साधकांचे सिद्ध झाले. याचप्रमाणे तत्त्वज्ञानी हे याच पंथाने श्रेष्ठत्वास पावले.
हा मार्गु जैं देखिजे । तैं तहान भूक विसरिजे । रात्रिदिवसु नेणिजे । वाटे इये ॥
जेव्हा हा मार्ग दृष्टीस पडतो, तेव्हा तहान व भूकही हरपतात. या वाटेने जात असता रात्र व दिवस याचे भान राहत नाही,
चालतां पाऊल जेथ पडे । तेथ अपवर्गाची खाणी उघडे । आव्हांटलिया तरी जोडे । स्वर्गसुख ॥
या मार्गाचे आक्रमण करीत असता, ज्या ठिकाणी मनुष्य पाऊल टाकील त्या ठिकाणी मोक्षाची खाणच उत्पन्न होते व कदाचित तो आडमार्गाने गेला तरी स्वर्गसुख मिळते.
निगिजे पूर्वींलिया मोहरा । कीं येइजे पश्चिमेचिया घरा । निश्चळपणें धनुर्धरा । चालणें एथिंचें ॥
तो पूर्वेच्या वाटेने निघून म्हणजे प्रवृत्तीची वाट सोडून (इंद्रियांचे आकलन करून) पश्चिमेस येतो,
(निवृत्तीच्या वाटेला लागतो.) हे धनुर्धरा, या ठिकाणचे चालणे कोणते म्हणशील तर निश्चलपणे बसणे, हे होय.
येणें मार्गें जया ठायां जाइजे । तो गांवो आपणचि होइजे । हें सांगों काय सहजें । जाणसी तूं ॥
या मार्गाने ज्या ठिकाणाला जातो, ते स्थानच (गाव) तो स्वतः बनतो, हे निराळे काय सांगावे? तू ते आपोआप जाणशील.
तेथ पार्थें म्हणितलें देवा । तरी तेंचि मग केव्हां । कां आर्तिसमुद्रौनि न काढावा । बुडतु जी मी ॥
तेव्हा पार्थ म्हणाला,‘देवा तर तुम्ही हे योगशास्त्र मला केव्हा सांगाल? कारण, उत्कंठारूप समुद्रात बुडालेला जो मी, त्या मला वर का न काढावा?’

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -