घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

गोमटें कांहीं पावे । तरी संतोषें तेणें नाभिभवे । जो वोखटेनि नागवे । विषादासी ॥
काही चांगले प्राप्त झाले तरी त्याच्या आनंदाने ज्याला गर्व होत नाही व वाईट गोष्टींपासून ज्याला दुःख होत नाही.
ऐसा हरिखशोकरहितु । जो आत्मबोधभरितु । तो जाण पां प्रज्ञायुक्तु । धनुर्धरा ॥
असा जो हर्षशोकरहित असून नेहमी आत्मविचारात निमग्न असतो, तोच अर्जुना, स्थिरबुद्धि असे जाण.
कां कूर्माचियापरी । उवाइला अवेव पसरी । ना तरी इच्छावशें आवरी । आपुले आपण ॥
किंवा, कासव आनंदात असता आपले हातपाय पसरते अथवा वाटेल तेव्हा आपले आपण आवरून धरते;
तैसीं इंद्रियें आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती । तयाची प्रज्ञा जाण स्थिति । पातली असे ॥
त्याप्रमाणे, ज्याची इंद्रिये स्वाधीन होऊन त्याच्या इच्छेप्रमाणे वागतात, त्याची बुद्धि स्थिर झाली आहे असे समज.
अर्जुना आणिकही एक । सांगेन ऐकें कवतिक । या विषयांतें साधक । त्यजिती नियमें ॥
अर्जुना, आणखी एक मौजेची गोष्ट तुला सांगतो, ऐक. जे साधक या विषयाचा नियमाने त्याग करितात,
श्रोत्रादि इंद्रियें आवरिती । परि रसने नियमु न करिती । ते सहस्रधा कवळिजती । विषयीं इहीं ॥
श्रोत्रादि इंद्रियाचे आकलन करितात, परंतु जिव्हेचा मात्र निग्रह करीत नाहीत, ते या विषयाकडून अनेक प्रकारे वेढले जातात.
जैसी वरिवरि पालवी खुडिजे । आणि मुळीं उदक घालिजे । तरी कैसेनि नाशु निपजे । तया वृक्षा ॥
एखाद्या झाडाचे वरचे वरचे शेंडे खुडले आणि मुळाशी पाणी घातले तर त्या झाडाचा नाश कसा होईल?
तो उदकाचेनि बळें अधिकें । जैसा आडवेनि आंगें फांके । तैसा मानसीं विषो पोखे । रसनाद्वारें ॥
ते जसे पाण्याच्या बळाने अधिकच फोफावते, त्याप्रमाणे या रसनेच्याद्वारे अंतःकरणात विषय अधिकाधिकच पुष्ट होतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -