घरElection 2023MP Election Analysis : मोदींकडून झंझावती प्रचार, चौहानांची 'लाडली'; हाच ठरला BJP...

MP Election Analysis : मोदींकडून झंझावती प्रचार, चौहानांची ‘लाडली’; हाच ठरला BJP विजयाचा फॅक्टर

Subscribe

भाजपला मिळालेल्या निकालाबाबत बोलताना काळजीवाहू मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारने आणलेल्या योजना मध्य प्रदेशात व्यवस्थित राबवल्या.

भोपाळ : देशातील पाच राज्यांपैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागत असून, मध्य प्रदेशमधील जनतेने पुन्हा एकदा कमलनाथ ऐवजी ‘कमळाला’ पसंती दिली आहे. भाजपाच्या या विजयामागील कारणांचे विश्लेषण केले असता भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला झंझावती प्रचार आणि शिवराज सिंह चौहान यांनी महिलांसाठी आणलेल्या योजनामुळे मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा ‘कमळ’च फुलल्याचे दिसून आले.(MP Election Analysis Jhanjavati campaign by Modi Chauhans pampered This was the factor of BJPs victory)

भाजपला मिळालेल्या निकालाबाबत बोलताना काळजीवाहू मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारने आणलेल्या योजना मध्य प्रदेशात व्यवस्थित राबवल्या. सोबतच मध्य प्रदेश सरकारने महिलांना समोर ठेऊन विविध योजना राबवल्या. यामध्ये लाडली लक्ष्मीपासून लाडली बहिणीपर्यंत योजनांचा समावेश आहे. यासोबतच गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, युवक, युवतींसाठी जे काम राज्य सरकारने केले त्याचे फलित आजच्या निकालातून दिसून आले. यासोबतच राजकीय चाणक्य म्हणून ओळख असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अचूक रणनिती यावेळी मध्य प्रदेशात लागू पडली.

- Advertisement -

हेही वाचा : RAJASTHAN ELECTION RESULT 2023: अशोक गहलोत संध्याकाळी 5.30 वाजता राज्यपालांकडे सोपवणार राजीनामा

महिलांसाठी राबवलेल्या काही योजना

मध्य प्रदेश सरकारने लाडली लक्ष्मी ते लाडली बहिण ही योजना, सोबतच स्थानिक निवडणुकीमध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण, कन्या विवाह, तसेच पंतप्रधानमंत्री मातृवंदन योजना योग्य पद्धतीने राबवणे, बेटी बचाव, बेटी पढाओ योजना, खरेदी विक्रीच्या व्यवहारात महिलांना 50 टक्के सूट, 35 टक्के भरती प्रक्रियेत महिलांना स्थान या सगळ्यांचा परिपाक म्हणजे भाजपला घवघवीत यश मिळाले.

- Advertisement -

हेही वाचा : Election Results : छत्तीसगडबाबत आत्मचिंतनाची गरज, MPच्या पराभावासाठी काँग्रेसचे दोन नेते जबाबदार; राऊतांचे मत

भारत जोडो यात्रेचा प्रभाव नाही

भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशमध्ये 12 दिवस होती. या यात्रेने तब्बल 386 कि.मी.चा प्रवास केला. या कालावधीत बुरहानपूर, खंडवा, खरगोन, इंदूर, उज्जैन आणि आगर माळवा जिल्ह्यातून यात्रा सुरू झाली होती. 4 डिसेंबर 2022 रोजी आगर माळवा जिल्ह्यातून यात्रा राजस्थानमध्ये निघून गेली होती. राहुल गांधी यांच्या मध्य प्रदेशमधील भारत जोडो यात्रेत कमलनाथ यांनीही प्रवास केला होता. या भारत जोडो यात्रेचा या निवडणुकीत काहीच परिणाम झालेला दिसला नाही.

मध्य प्रदेशातील 15 जिल्हे काढले पिंजून

भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 दिवसांत 15 निवडणूक कार्यक्रम घेतले. ज्यात जाहीर सभा, रॅली आणि रोड शो यांचा समावेश होता. या काळात त्यांनी 15 जिल्ह्यांचा दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 नोव्हेंबर रोजी रतलाम जिल्ह्यात निवडणूक प्रचाराला सुरुवात केली होती. यानंतर सिवनी, खांडवा, सिधी, दमोह, मुरैना, गुना, सतना, छतरपूर, नीचम, बरवानी, बैतुल, शाजापूर, झाबुआ या जिल्ह्यांमध्ये निवडणूक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या शेवटी, पंतप्रधान इंदौरला पोहोचले, जिथे त्यांनी 14 नोव्हेंबर रोजी रोड शो केला. पंतप्रधानांनी त्यांच्या निवडणूक कार्यक्रमात मध्य प्रदेशातील 15 जिल्ह्यांचा समावेश होता. ज्यात एकूण 71 विधानसभा जागांचा समावेश होता. त्यांच्या प्रचार रॅलीमुळे या निवडणुकीत फायदा झाल्याचे दिसून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -