घरElection 2023Rajasthan Election Results 2023: राजस्थानमध्ये परंपरा कायम! भाजपकडे बहुमत; 'हे' दिग्गज नेते...

Rajasthan Election Results 2023: राजस्थानमध्ये परंपरा कायम! भाजपकडे बहुमत; ‘हे’ दिग्गज नेते पिछाडीवर

Subscribe

निवडणूक आयोगाच्या निवडणुकीच्या ट्रेंडनुसार, भाजप 113 जागांवर आघाडीवर आहे.

जयपूर:Rajasthan Election Result 2023: राजस्थान विधानसभा निवडणुकीचे निकाल आज (03-12-23) येणार आहेत. विधानसभेच्या 200 जागांसह राज्यात 199 जागांवर मतदान झाले. सर्व केंद्रांवर सकाळी 8 वाजल्यापासून पोस्टल बॅलेटद्वारे आणि सकाळी 8.30 वाजेपासून ईव्हीएमद्वारे मतमोजणी सुरू झाली आहे. (Rajasthan Election Results 2023 Tradition continues in Rajasthan BJP has majority These legendary leaders behind)

या जागांवर पक्ष पुढे 

  • भाजप-113
  • काँग्रेस- 71

निवडणूक आयोगाच्या निवडणुकीच्या ट्रेंडनुसार, भाजप 113 जागांवर आघाडीवर आहे.

- Advertisement -

‘या’ दिग्गज नेत्यांबाबत अपडेट

सचिन पायलट– सचिन पायलट टोंक विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. या जागेवर भाजपचे उमेदवार अजितसिंह मेहता पिछाडीवर आहेत.

- Advertisement -

अशोक गेहलोत– सरदारपुरा विधानसभा मतदारसंघातून अशोक गेहलोत आघाडीवर आहेत. भाजपचे उमेदवार प्राध्यापक डॉ.महेंद्र राठोड पिछाडीवर आहेत.

किरोरी लाल मीना– किरोरी लाल मीना सवाई माधोपूर विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. काँग्रेसचे उमेदवार दानिश अबरार पिछाडीवर आहेत.

गजेंद्र सिंह– लोहावत विधानसभा मतदारसंघातून गजेंद्र सिंह आघाडीवर आहेत. दरम्यान, किश्नाराम विश्नोई हे काँग्रेसकडून पिछाडीवर आहेत.

वसुंधरा राजे– झालरापाटन विधानसभा मतदारसंघातून वसुंधरा राजे आघाडीवर आहेत. काँग्रेसचे उमेदवार रामलाल पिछाडीवर आहेत.

(हेही वाचा: Chhattisgarh Election Results : विजयी घोडदौडीचे भाजपाने सांगितले कारण; “छत्तीसगडमध्ये विकास कामे…” )

राजस्थान विधानसभा निवडणुकीत 75.45 टक्के झाले मतदान

यावेळी राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 2018 च्या तुलनेत जास्त मतदान झाले आहे. यंदा राज्यात 75.45 टक्के मतदान झाले. निवडणूक विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, 2023 च्या विधानसभा निवडणुकीत गेल्या वेळेपेक्षा 0.73 टक्के जास्त मतदान झाले. यामध्ये पोस्टल बॅलेटद्वारे झालेल्या 0.83 टक्के मतदानाचाही समावेश आहे. राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबर रोजी 200 विधानसभा मतदारसंघांपैकी 199 मतदान केंद्रांवर 51,000 हून अधिक मतदान झाले. श्रीगंगानगर जिल्ह्यातील करणपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक काँग्रेस उमेदवाराच्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -